WTC गुणतालिकेत उलटफेर, बांगलादेशने भारताला टाकले मागे
पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Points Table : बांगलादेशने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. या विजयासह हा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताच्या पुढे गेला आहे, तर डब्ल्यूटीसीच्या तिसऱ्या आवृत्तीची पराभवाने सुरुवात करणारा माजी चॅम्पियन न्यूझीलंड आठव्या क्रमांकावर घसरला आहे.
Team India T20 : टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच नंबर १, पाकिस्तानला मागे टाकले
Bangladesh Win Test : बांगलादेशचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक कसोटी विजय!
डब्ल्यूटीसीच्या (2023-25) तिस-या हंगामाची सुरुवात दक्षिण आफ्रिका वगळता सर्व संघांनी सुरू केली आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे, तर बांगलादेशने न्यूझीलंडला पराभूत करून दुसऱ्या स्थान गाठले आहे. (WTC Points Table)
टीम इंडियाने डब्ल्यूटीसी 2023-2025 च्या मोहिमेचा प्रारंभ वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेने केला. भारताने त्या मालिकेतील पहिला सामना डाव आणि 141 धावांच्या फरकाने जिंकला, मात्र दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने रोहितसेनेला 66.67 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. डब्ल्यूटीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया चौथ्या, वेस्ट इंडिज पाचव्या आणि इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे. (WTC Points Table)
The post WTC गुणतालिकेत उलटफेर, बांगलादेशने भारताला टाकले मागे appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Points Table : बांगलादेशने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. या विजयासह हा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताच्या पुढे गेला आहे, तर डब्ल्यूटीसीच्या तिसऱ्या आवृत्तीची पराभवाने सुरुवात करणारा माजी चॅम्पियन न्यूझीलंड आठव्या क्रमांकावर घसरला आहे. Team India T20 : टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच नंबर १, …
The post WTC गुणतालिकेत उलटफेर, बांगलादेशने भारताला टाकले मागे appeared first on पुढारी.