पहिल्याच दिवशी रोवला झेंडा, वर्ल्डवाईड ११६ कोटी पार
पुढारी ऑनलाईन डेस्क : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर ॲनिमल चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. (Animal Collection) तब्बल ११६ कोटींचे कलेक्शन ॲनिमल चित्रपटाने केला असून शनिवार, रविवार सुट्ट्यांचा फायदा चित्रपटाला होणार आहे. (Animal Collection)
संबंधित बातम्या –
Salaar Trailer : ‘सालार’च्या ट्रेलरमध्ये KGF ची झलक, फॅन्समध्ये क्रेझ वाढली! (Video)
‘मुक्ताई’ चित्रपटाचे नवे आकर्षक पोस्टर भेटीला
दबंगी – मुलगी आई रे आई : “स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते”
‘ॲनिमल’ सुक्रवारी १ डिसेंबर रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाने छप्परफाड कमाई केलीय. यावर्षातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा ओपनिंग चित्रपट बनला आहे. या चित्रपटाची क्रेझ बॉक्स ऑफिसच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दिसली.
रणबीरच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६१ कोटी रुपयांचे ओपनिंग केले होते. रणबीरच्या आधी अधिक कमाई करणारा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी ३६.४२ कोटी रुपयांची कमाई केली होती. कमाईच्या बाबतीत ‘जवान’ सोडून यावर्षी अन्य दोन्ही हिट चित्रपटांमध्ये ‘पठान’ आणि ‘गदर २’ पेक्षा पुढे आहे. रिपोर्टनुसार, ‘ॲनिमल’ने शानदार ॲडव्हान्स बुकिंगसोबत ६१ कोटी रुपयांचे ओपनिंग केले आहे. सर्वाधिक चित्रपटाने एनसीआरमध्ये कमाई केली आहे.
वर्ल्डवाईट ११६ कोटी
ॲनिमल चित्रपटाची वर्ल्डवाईड कमाई ११६ कोटी रुपये आहे. ॲनिमलने ‘पठान’चा रेकॉर्डदेखील मोडला आहे. ‘पठान’ ने पहिल्या दिवशी भारतात ५७ कोटींची कमाई केली होती तर वर्ल्डवाईड कमाई १.०४.८० रोटी होती.
The post पहिल्याच दिवशी रोवला झेंडा, वर्ल्डवाईड ११६ कोटी पार appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर ॲनिमल चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. (Animal Collection) तब्बल ११६ कोटींचे कलेक्शन ॲनिमल चित्रपटाने केला असून शनिवार, रविवार सुट्ट्यांचा फायदा चित्रपटाला होणार आहे. (Animal Collection) संबंधित बातम्या – Salaar Trailer : ‘सालार’च्या ट्रेलरमध्ये KGF ची झलक, फॅन्समध्ये क्रेझ वाढली! (Video) …
The post पहिल्याच दिवशी रोवला झेंडा, वर्ल्डवाईड ११६ कोटी पार appeared first on पुढारी.