दु्र्दैवी! भारतीय विद्यार्थ्याचा ब्रिटनमधील थेम्स नदीत सापडला मृतदेह

पुढारी ऑनलाईन : ब्रिटनमध्ये (UK) उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा लंडन जवळील थेम्स नदीत मृतदेह सापडला आहे. या २३ वर्षीय मुलाचे नाव मितकुमार पटेल असे आहे. तो सप्टेंबरमध्ये उच्च शिक्षणासाठी गेला होता. तो १७ नोव्हेंबर रोजी बेपत्ता असल्याची नोंद झाली होती. मेट्रोपॉलिटन पोलिसांना २१ नोव्हेंबर रोजी पूर्व लंडनमधील कॅनरी वार्फजवळ मितकुमार पटेल यांचा मृतदेह सापडला … The post दु्र्दैवी! भारतीय विद्यार्थ्याचा ब्रिटनमधील थेम्स नदीत सापडला मृतदेह appeared first on पुढारी.
#image_title

दु्र्दैवी! भारतीय विद्यार्थ्याचा ब्रिटनमधील थेम्स नदीत सापडला मृतदेह

पुढारी ऑनलाईन : ब्रिटनमध्ये (UK) उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा लंडन जवळील थेम्स नदीत मृतदेह सापडला आहे. या २३ वर्षीय मुलाचे नाव मितकुमार पटेल असे आहे. तो सप्टेंबरमध्ये उच्च शिक्षणासाठी गेला होता. तो १७ नोव्हेंबर रोजी बेपत्ता असल्याची नोंद झाली होती.
मेट्रोपॉलिटन पोलिसांना २१ नोव्हेंबर रोजी पूर्व लंडनमधील कॅनरी वार्फजवळ मितकुमार पटेल यांचा मृतदेह सापडला होता. नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मितकुमार घराबाहेर फिरण्यासाठी गेला होता. तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्याने चाव्यांचा सेट मागे ठेवल्याचेही आढळून आले आहे.
मृताचे नातेवाईक ऑनलाइन मदत गोळा करत आहे आणि त्यांनी गेल्या आठवड्यापासून सुमारे ४,५०० ब्रिटिश पाउंड रक्कम जमा केली आहे. “मितकुमार हा एका शेतकरी कुटुंबातील होता आणि ते खेडेगावात राहत आहेत. तो १७ नोव्हेंबर २०२३ पासून बेपत्ता होता. २१ नोव्हेंबरला पोलिसांना त्याचा मृतदेह कॅनरी वार्फमधील पाण्यात सापडला. हे आम्हा सर्वांसाठी दुःखदायक होते. म्हणून, आम्ही त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचा मृतदेह भारतात पाठवला जाईल,” असे आवाहन मदतासाठी करण्यात आले होते. जमा झालेले पैसे भारतातील त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाकडे सुरक्षितपणे पाठवले जातील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
इव्हनिंग स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, पटेल हा शेफिल्ड हलम विद्यापीठात पदवी शिक्षण आणि त्यासोबतच पार्ट-टाइम नोकरी करत होता. तो लंडनमध्ये राहत होता आणि २० नोव्हेंबर रोजी तो शेफिल्डला जाणार होता. (UK)
याआधी अमेरिकेच्या ओहायो राज्यात २६ वर्षीय भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याची कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आदित्य अदलाखा (Aaditya Adlakha) असे त्याचे नाव आहे. ही घटना धक्कादायक आणि दुःखद असल्याचे सिनसिनाटी मेडिकल स्कूलने म्हटले होते.
हे ही वाचा :

भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत कारमध्ये गोळ्या झाडून हत्या
युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलचा गाझावर हल्ला, १७८ ठार
पृथ्वीच्या कक्षेत हजारो उडत्या तबकड्या

 
The post दु्र्दैवी! भारतीय विद्यार्थ्याचा ब्रिटनमधील थेम्स नदीत सापडला मृतदेह appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : ब्रिटनमध्ये (UK) उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा लंडन जवळील थेम्स नदीत मृतदेह सापडला आहे. या २३ वर्षीय मुलाचे नाव मितकुमार पटेल असे आहे. तो सप्टेंबरमध्ये उच्च शिक्षणासाठी गेला होता. तो १७ नोव्हेंबर रोजी बेपत्ता असल्याची नोंद झाली होती. मेट्रोपॉलिटन पोलिसांना २१ नोव्हेंबर रोजी पूर्व लंडनमधील कॅनरी वार्फजवळ मितकुमार पटेल यांचा मृतदेह सापडला …

The post दु्र्दैवी! भारतीय विद्यार्थ्याचा ब्रिटनमधील थेम्स नदीत सापडला मृतदेह appeared first on पुढारी.

Go to Source