‘मिचौंग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ तीव्र होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर आग्नेय(पूर्व-दक्षिण) भारतातील पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Cyclone ‘Michaung’ Update) रविवारी ३ डिसेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ तीव्र होणार आहे. या चक्रीवादळाचा पुद्दुचेरीसह तमिळनाडू … The post ‘मिचौंग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी सरकारचा महत्त्वाचा निर्णय appeared first on पुढारी.
#image_title
‘मिचौंग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी सरकारचा महत्त्वाचा निर्णय


पुढारी ऑनलाईन डेस्क: पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ तीव्र होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर आग्नेय(पूर्व-दक्षिण) भारतातील पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Cyclone ‘Michaung’ Update)
रविवारी ३ डिसेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ तीव्र होणार आहे. या चक्रीवादळाचा पुद्दुचेरीसह तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला देखील तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी सरकारने काही शहरातील शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Cyclone ‘Michaung’ Update)
Cyclone ‘Michaung’ Update: चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर
‘मिचौंग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ४ डिसेंबर रोजी पुद्दुचेरीसह, पुद्दुचेरीमधील कराईकल आणि यानाम या किनारी प्रदेशातील शहरांमधील सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पुद्दुचेरी सरकारने दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने ट्विटरवरून दिले आहे. (Cyclone ‘Michaung’ Update)
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे रविवारी ३ डिसेंबरपासून उत्तर तामिळनाडू किनारपट्टी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर पाऊस आणि वाऱ्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यानंतर हे चक्रीवादळ ४ डिसेंबरच्या संध्याकाळी तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यातील किनारे ओलांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाने (NDRF) तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पुद्दुचेरी येथे १८ बचाव पथके उपलब्ध तैनात केली आहेत. तसेच कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणखी १० अतिरिक्त बचाव पथके सज्ज ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज
याआधी शुक्रवारी (दि.१) कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने (NCMC) येऊ घातलेल्या चक्रीवादळासाठी राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ‘मिचौंग’ चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जहाजे आणि विमानांसह तटरक्षक दल, लष्कर आणि नौदलाच्या बचाव आणि मदत पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे, असे देखील प्रशासनाने माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे.
हेही वाचा:

Cyclone Michaung | पुढील २४ तासांत ‘मिचौंग’ आणखी तीव्र होणार; ‘या’ राज्यात मुसळधार
Cyclone Michaung | बंगालच्या उपसागरात ३ डिसेंबरला मिचौंग चक्रीवादळ; IMD ची माहिती
Cyclone Michaung | बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळाची निर्मिती; ‘या’ राज्यात मुसळधारेची शक्यता

 
The post ‘मिचौंग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी सरकारचा महत्त्वाचा निर्णय appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ तीव्र होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर आग्नेय(पूर्व-दक्षिण) भारतातील पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Cyclone ‘Michaung’ Update) रविवारी ३ डिसेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ तीव्र होणार आहे. या चक्रीवादळाचा पुद्दुचेरीसह तमिळनाडू …

The post ‘मिचौंग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी सरकारचा महत्त्वाचा निर्णय appeared first on पुढारी.

Go to Source