जळगावातील पाच गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार

जळगाव, शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. यामध्ये शहरातील पाच गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्ह्यात टोळी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये शहरातील कांचन नगरात राहणारे टोळीप्रमुख हितेश संतोष शिंदे (वय-२५), टोळी सदस्य संतोष उर्फ जागो रमेश शिंदे (वय-४५), आकाश उर्फ नाकतोड्या संजय मराठे (वय-२२), सुमित … The post जळगावातील पाच गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार appeared first on पुढारी.
#image_title

जळगावातील पाच गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार

जळगाव, शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. यामध्ये शहरातील पाच गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
जिल्ह्यात टोळी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये शहरातील कांचन नगरात राहणारे टोळीप्रमुख हितेश संतोष शिंदे (वय-२५), टोळी सदस्य संतोष उर्फ जागो रमेश शिंदे (वय-४५), आकाश उर्फ नाकतोड्या संजय मराठे (वय-२२), सुमित उर्फ गोल्या संजय मराठे (वय-२७) आणि संजय देवचंद मराठी (वय-५०) यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या आदेशाची उल्लंघन करणे, दहशतवादी कारवाया, मारहाण, शस्त्र बाळगणे, गोळीबार करणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी या गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना पाठवला. या प्रस्तावावर विचार करून जिल्हा परिषद शिक्षक यांनी मंजुरी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली.
दरम्यान, या पाचही जणांना दोन वर्षांसाठी जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या गुन्हेगारांना जिल्ह्याच्या बाहेर अटक झाल्यास त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :

Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, निमंत्रण पत्रिका वाटपास प्रारंभ
Dantewada IED Blast : छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी
Cyclone Michaung | पुढील २४ तासांत ‘मिचौंग’ आणखी तीव्र होणार; ‘या’ राज्यात मुसळधार

The post जळगावातील पाच गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार appeared first on पुढारी.

जळगाव, शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. यामध्ये शहरातील पाच गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्ह्यात टोळी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये शहरातील कांचन नगरात राहणारे टोळीप्रमुख हितेश संतोष शिंदे (वय-२५), टोळी सदस्य संतोष उर्फ जागो रमेश शिंदे (वय-४५), आकाश उर्फ नाकतोड्या संजय मराठे (वय-२२), सुमित …

The post जळगावातील पाच गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार appeared first on पुढारी.

Go to Source