जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; 16 जणांवर गुन्हा दाखल
मंचर : पुढारी वृत्तसेवा : पेठ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत जमीन मोजणीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत दोन्ही गटातील 16 जणांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा रवींद्र काळे व किशोर अनंतराव ढमाले यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोभा रवींद्र काळे (वय 50, रा. पेठ) जमीन गट नंबर 43 येथे जमिनीची खासगी मोजणीसाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी रूपाली विजय ढमाले, दीपिका किशोर ढमाले, तिचा भाऊ धुमाळ (पूर्ण नाव माहीत नाही), विजय आनंथा ढमाले, किशोर आनंथा ढमाले (सर्व रा. पेठ) यांनी जमीन मोजण्याच्या कारणावरून बेकायदा जमाव जमवून फिर्यादी शोभा रवींद्र काळे यांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली. भांडणात फिर्यादीचे मंगळसूत्र गहाळ झाले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
महत्वाची बातमी ! कार्तिकीनिमित्त मंगळवारपासून आळंदीत वाहनांना प्रवेश बंदी
Israel-Hamas War | युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलचा गाझावर हल्ला, १७८ ठार
Nashik Crime : रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
किशोर अनंतराव ढमाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पेठ गावचे हद्दीत त्यांच्या हॉटेल भीमाशंकर येथे महेंद्र राजपाल मित्तल, वकील रविंद्र लालचंद कर्नावट (दोघे रा. राजगुरुनगर, ता. खेड), शोभा रवींद्र काळे, रवींद्र राणू काळे, आकाश भानुदास शिंदे, एच. जी. आनंदा, कुशल नवीन गोयल, माया गुलाब बराडे, आर्चना संजय गिरी, स्नेहा राजेंद्र लांडगे, कोमल आश्विन कांबळे (सर्व रा. पुणे) यांनी जमिनीचा ताबा घेण्यासाठी येऊन हॉटेल भीमाशंकर येथील फ्रिजचे नुकसान करत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. मंचर पोलिसांनी दोन्ही गटातील 16 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
The post जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; 16 जणांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.
मंचर : पुढारी वृत्तसेवा : पेठ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत जमीन मोजणीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत दोन्ही गटातील 16 जणांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा रवींद्र काळे व किशोर अनंतराव ढमाले यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या …
The post जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; 16 जणांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.