Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; दादा भुसे यांनी राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणी जामिनासाठी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर होते. संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 फेब्रुवारीला होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे संजय राऊत यांनी न्यायालयाकडून वेळ वाढवून घेतल्याची माहिती … The post Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार appeared first on पुढारी.
#image_title

Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; दादा भुसे यांनी राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणी जामिनासाठी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर होते. संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 फेब्रुवारीला होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे संजय राऊत यांनी न्यायालयाकडून वेळ वाढवून घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान, यावेळी मालेगाव कोर्टाबाहेरुन संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. राऊत म्हणाले, चोराला चोर म्हणण्याचा मला संविधानानुसार अधिकार आहे. 178 कोटींचा हिशोब मागितला त्यात गैर काय? भ्रष्टाचारावरुन प्रश्न केल्यास अवमान कसा? तुम्ही राज्याचे मंत्री आहात, तुमच्याकडे हिशोब मागितला म्हणून तुम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करतात. पण, भ्रष्टाचारावर लढण्यासाठी आम्हाला खटल्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागत असेल तर आम्ही ती ठेऊ, मात्र भ्रष्टाचारावर तडजोड होणार नाही. लोकांना हिशोब हवा आहे, हिशोब देणा पडेगा ही तर भाजपचीच गर्जना आहे. कोणत्याही परिस्थितीत गुडघे टेकवणार नाही असे राऊत म्हणाले.
गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी दादा भुसे यांनी राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी जामिनासाठी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर होते. न्यायालयाने राऊतांना जामीन मंजूर केल्यानंतर कोर्टाबाहेर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दादा भुसे यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला.
The post Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; दादा भुसे यांनी राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणी जामिनासाठी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर होते. संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 फेब्रुवारीला होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे संजय राऊत यांनी न्यायालयाकडून वेळ वाढवून घेतल्याची माहिती …

The post Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार appeared first on पुढारी.

Go to Source