महत्वाची बातमी ! कार्तिकीनिमित्त मंगळवारपासून आळंदीत वाहनांना प्रवेश बंदी
आळंदी : पुढारी वृत्तसेवा : संत श्रीज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवारी (दि.5) प्रारंभ होणार आहे. यात्रा काळात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता वारी काळात वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली आहे. केवळ दिंड्यांच्या पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवार (दि.5) ते मंगळवार (दि.12) पर्यंत ही बंदी असणार असून या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून चाकण – शिक्रापूर महामार्गे चाकण, वडगाव घेनंद, कोयाळी, मरकळ तसेच पुणे – नगर महामार्गे लोणीकंद फाटा, तुळापूर, मरकळ, आळंदी व चर्होली बुद्रुक फाटा ते चर्होली खुर्द अशा जोडरस्त्यांचा वापर करता येणार आहे. दरम्यान, सोहळ्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज होत असून, सोहळ्यासाठी प्रत्येक मुख्य चौकात दक्षता कक्ष उभारण्यात आला आहे. प्रमुख मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविण्यात येत असून परिसराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा :
Nashik Crime : रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
Pune News : काका-पुतण्यात वर्चस्वाची लढाई
The post महत्वाची बातमी ! कार्तिकीनिमित्त मंगळवारपासून आळंदीत वाहनांना प्रवेश बंदी appeared first on पुढारी.
आळंदी : पुढारी वृत्तसेवा : संत श्रीज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवारी (दि.5) प्रारंभ होणार आहे. यात्रा काळात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता वारी काळात वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली आहे. केवळ दिंड्यांच्या पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवार (दि.5) ते मंगळवार (दि.12) पर्यंत ही बंदी असणार असून या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा …
The post महत्वाची बातमी ! कार्तिकीनिमित्त मंगळवारपासून आळंदीत वाहनांना प्रवेश बंदी appeared first on पुढारी.