तामिळनाडूत मुसळधार पाऊस; शाळा महाविद्यालये बंद

तामिळनाडूत मुसळधार पाऊस; शाळा महाविद्यालये बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क: तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना पावसाचे झोडपले आहे. अनेक ठिकाणी मुसळदार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील तंजोर, तिरुवरूर, अरियालूर, मायिलादुथुराई, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी/कारियाक्कल यासह विविध जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Tamil Nadu Rain)
भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी (दि.१३) तमिळनाडू आणि पुद्दुचेरीसाठी १३ आणि १४ नोव्हेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यानुसार तमिळनाडूत जोरदार पाऊस सुरू आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी तमिळनाडूतील चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि पुद्दुचेरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. (Tamil Nadu Rain)

Tamil Nadu | Schools and colleges in various districts including Tanjore, Tiruvarur, Ariyalur, Mayiladuthurai, Villupuram, Cuddalore and Pondicherry/Kariakkal remain closed today, in view of heavy rainfall in the region.
— ANI (@ANI) November 14, 2023

#WATCH | Rain lashes various parts of Nagapattinam in Tamil Nadu pic.twitter.com/XedPcNKMQB
— ANI (@ANI) November 14, 2023

दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीमध्ये चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, तमिळनाडूत जोरदार पाऊस सुरू असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच तमिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 115.6 ते 204.4 मिमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. (Tamil Nadu Rain)

🌧️तमिलनाडु, पुडुचेरी और कराईकल के तटीय और डेल्टा जिलों में दर्ज की गई भारी वर्षा!
💦जिला नागपट्टिनम के वेलंकन्नी और नागपट्टिनम में 17 सेमी व 15 सेमी, कराईकल में 14 सेमी, जिला तिरुवरुर के नन्निलम में 12 सेमी और जिला कुड्डालोर में 12 सेमी वर्षा दर्ज की गई। 💦 pic.twitter.com/1XvO0GZT3Z
— India Meteorological Department (@Indiametdept) November 14, 2023

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील किनारी भागात मासेमारीवर दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे. असेही वृत्त एएनआयने दिले आहे.

#WATCH | Fishing activities banned for two days in the coastal areas of Tamil Nadu’s Ramanathapuram district as the low-pressure area over the Bay of Bengal is expected to turn into Depression pic.twitter.com/KBwP2fNboI
— ANI (@ANI) November 14, 2023

हेही वाचा:

Amazon layoffs | ॲमेझॉनमध्ये नोकरकपात सुरूच, गेम्स डिव्हिजनमधील ‘इतक्या’ जणांना नारळ
Pune News : अजित पवारांची गोविंदबागेकडे पाठ; पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव

The post तामिळनाडूत मुसळधार पाऊस; शाळा महाविद्यालये बंद appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना पावसाचे झोडपले आहे. अनेक ठिकाणी मुसळदार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील तंजोर, तिरुवरूर, अरियालूर, मायिलादुथुराई, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी/कारियाक्कल यासह विविध जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Tamil Nadu Rain) भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी (दि.१३) तमिळनाडू आणि …

The post तामिळनाडूत मुसळधार पाऊस; शाळा महाविद्यालये बंद appeared first on पुढारी.

Go to Source