रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– परराज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारकपणे पाठलाग करून जप्त केला. दादर नगर हवेली आणि दिव-दमण येथेच विक्रीची परवानगी असलेल्या मद्यसाठ्याची सहा चाकी कंटेनरमधून वाहतूक केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या येवला आणि नाशिकच्या पथकाने मोठ्या शिताफीने ही कारवाई केली.
शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्ह्यातून विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या मद्यसाठ्याची कंटेनरमधून वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार वेगवेगळे पथके तयार करून येवला-विंचूर शहर परिसरात पाठविण्यात आले. संशयित वाहनांचा शोध घेतला जात असतानाच त्यांना भरवस फाटा चौफुली येथे एक संशयित आयशर कंपनीचा पॅक बॉडी कंटेनर (एमएच०४ आरबी ४८६८) दिसून आला. या कंटेनरचा पाठलाग करून भरवस फाट्याजवळ तो अडविण्यात आला. वाहन चालकाकडे कंटेनरमधील मालाची विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पथकाचा संशय बळावला. त्यामुळे पथकाने तपासणीचा निर्णय घेत कंटेनरचा मागील दरवाजा उघडला. तर त्यात परराज्यात निर्मित व दादर नगर हवेली आणि दमण दिव येथे विक्रीसाठी परवानगी असलेला विदेशी साठा आढळून आला.
NAMCO Bank Election : २१ जागांसाठी २७२ उमेदवारी अर्ज दाखल
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त डॉ. बा. ह. तडवी, नाशिक अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक ए. एस. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली येवल्याचे निरीक्षक विठ्ठल चौरे, दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अवधूत पाटील, संतोष मुंढे, विठ्ठल हाके, अमन तडवी, मुकेश निंबेकर यांनी ही कारवाई केली.
५०१ बॉक्ससह संशयित ताब्यात
कंटेनरमध्ये एकुण ५०१ बॉक्समध्ये १७ हजार २३२ मद्याच्या ८० लाख ७० हजार ५२० रुपये किंमतीच्या बाटल्या आढळून आल्या. त्यासमवेत संशयित रमजान खान सलमान खान (२७, रा. नसीरपूर, पो. पृथ्वीगंज, राणीगंज, प्रतापगड, उत्तरप्रदेश) यास ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :
Nashik ZP : शासकीय सुट्यांच्या दिवशी मिनी मंत्रालय सुरू राहणार, सीईओंचा आदेश
नव्या पिग्मी स्क्विड प्रजातींना जपानी नावे
संजय राऊतांनी चुकीचे वक्तव्य केल्यास न्यायालयात दाद मागू ! दादा भुसे
The post रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– परराज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारकपणे पाठलाग करून जप्त केला. दादर नगर हवेली आणि दिव-दमण येथेच विक्रीची परवानगी असलेल्या मद्यसाठ्याची सहा चाकी कंटेनरमधून वाहतूक केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या येवला आणि नाशिकच्या पथकाने मोठ्या शिताफीने ही कारवाई केली. शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्ह्यातून …
The post रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.