टी-20 मध्ये टीम इंडियाच नंबर १, पाकिस्तानला मागे टाकले
पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-20 मालिका ३-१ ने जिंकली. यासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या युवा टीम इंडियाने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकत टी-20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. (Team India T20)
2006 मध्ये टी-20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये पदार्पण केल्यापासून भारताने 213 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 136 सामन्यात विजय तर, 67 सामन्यात पराभव स्वीकारावे लागले आहेत आणि एक सामना बरोबरीत राहिला आहे. तर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. टी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये भारताची विजयाची टक्केवारी ६७.६३ आहे.
या विजयासह भारताने 226 सामन्यांमध्ये 135 सामन्यात विजय मिळवणाऱ्या पाकिस्तानला मागे टाकले आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड (200 सामन्यांत 102 विजय), ऑस्ट्रेलिया (181 सामन्यांत 95 विजय) आणि दक्षिण आफ्रिका (171 सामन्यांत 95 विजय) हे इतर संघ आहेत.
India moves to the top with the most wins for a team in Men’s T20I, after winning the five-match series 3-1 against Australia in Raipur.
(Picture: ICC) pic.twitter.com/hHXMEoWTB9
— ANI (@ANI) December 2, 2023
हेही वाचा :
लूप रोडवर अडथळ्यांची शर्यत : नागरीक त्रस्त
पणजी : दोन कारच्या अपघातात हैदराबादच्या ३ पर्यटकांचा मृत्यू
Nashik ZP : शासकीय सुट्यांच्या दिवशी मिनी मंत्रालय सुरू राहणार, सीईओंचा आदेश
The post टी-20 मध्ये टीम इंडियाच नंबर १, पाकिस्तानला मागे टाकले appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-20 मालिका ३-१ ने जिंकली. यासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या युवा टीम इंडियाने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकत टी-20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थान …
The post टी-20 मध्ये टीम इंडियाच नंबर १, पाकिस्तानला मागे टाकले appeared first on पुढारी.