भविष्यात एका दिवसात 24 ऐवजी असणार 25 तास?

बर्लिन : कधी कधी आपल्या कल्पनेपेक्षाही वेगळे संशोधन होत असते. अशी अनेक संशोधने ही बहुतांशी भविष्यातीलच असतात हे विशेष! एका दिवसात किती तास असतात? असे विचारले तर 24 तास हे उत्तर अगदी सहजपण कोणीही देऊ शकेल; पण एका दिवसात 25 तास असतील असं कोणी सांगितलं तर? थोड आश्चर्य वाटलं ना. पण वैज्ञानिकांनी असा दावा केला … The post भविष्यात एका दिवसात 24 ऐवजी असणार 25 तास? appeared first on पुढारी.
#image_title

भविष्यात एका दिवसात 24 ऐवजी असणार 25 तास?

बर्लिन : कधी कधी आपल्या कल्पनेपेक्षाही वेगळे संशोधन होत असते. अशी अनेक संशोधने ही बहुतांशी भविष्यातीलच असतात हे विशेष! एका दिवसात किती तास असतात? असे विचारले तर 24 तास हे उत्तर अगदी सहजपण कोणीही देऊ शकेल; पण एका दिवसात 25 तास असतील असं कोणी सांगितलं तर? थोड आश्चर्य वाटलं ना. पण वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे. भविष्यात अशी वेळ येईल की एका दिवसात 24 ऐवजी 25 तास असतील असे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती असलेला संपूर्ण एक दिवस हा 24 तासांचा असतो. पण दिवसाचे 25 तासदेखील असू शकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पृथ्वीच्या फिरण्याचा कल यामागे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. जर्मनीतील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकने (टीयूएम) दिवसात 25 तास असतील असा हा दावा केला आहे. म्युनिकचे विद्यापीठ खगोलशास्त्राच्या क्षेत्रात संशोधन करत आहे. ही संस्था पृथ्वीविषयी माहिती मिळवण्यासाठी विशेष प्रकारची उपकरणे वापरत आहे. याला ‘रिंग लेसर’ म्हणतात.
पृथ्वीच्या परिभ्रमणाचा नमुना आणि वेग मोजणे हे त्याचे काम आहे. हे इतके अचूकपणे कार्य करते की ते पृथ्वीच्या हालचालीतील लहान-मोठे बदल देखील सहज ओळखते. पृथ्वीच्या परिभ्रमणातील चढउतार हे खगोलशास्त्रासाठी खूप महत्त्वाचे आहेत. यातून अनेक रंजक माहिती समोर येत असते. आता या बदलामुळे एका दिवसात तास वाढू शकतात ही बाब समोर आल्याची माहिती टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकच्या या संशोधनाशी संबंधित प्रकल्प प्रमुख अ‍ॅलरिच शेरिबर यांनी दिली.
घन आणि द्रव यासारख्या गोष्टी पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर परिणाम करतात. हे बदल शास्त्रज्ञांना नवीन माहिती देतात आणि एल निनोसारख्या हवामानाशी संबंधित बदलांचे परिणाम समजून घेण्यास मदत करतात, असे शास्त्रज्ञ सांगतात. खगोलशास्त्रात हजारो वर्षे अनेक गोष्टी घडत आहेत; पण दिवसाचे 25 तास असे याआधी कधी ऐकले नव्हते. मग तास नक्की कसे वाढतील असा प्रश्न विचारला जातोय. यावर संशोधकांनी उत्तर दिले आहे. पृथ्वीच्या फिरण्याचा एक ट्रेंड समोर आला आहे त्यावरून ते तासांमध्ये वाढ झाल्याचे दर्शवत असल्याचे संशोधक सांगतात. पृथ्वीचे परिभ्रमण सरकत असून नवीन संशोधनात याला दुजोरा देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
लेझर रिंग एक जायरोस्कोप असून पृथ्वीच्या 20 फूट खाली एका विशेष दाबाच्या भागात आहे. येथून निघणारा लेझर पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगात झालेला बदल लगेच ओळखतो. इथून शास्त्रज्ञांनी तास वाढवण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब केले असल्याचे सांगण्यात येत आहे. पृथ्वीशी संबंधित असा डेटा काढणे सोपे नव्हते. शास्त्रज्ञांनी यासाठी लेसरचे मॉडेल विकसित केले, यामुळे पृथ्वीच्या हालचालींचा कल कळू शकेल. त्याच्या मदतीने अचूक रोटेशन माहिती मिळू शकते, असे वैज्ञानिक सांगतात.
डायनासोरच्या काळात 23 तासांचा दिवस?
आजचा दिवस 24 तासांचा आहे; पण असे नेहमीच नव्हते. डायनासोरच्या काळात एका दिवसात 23 तास होते, असे सांगण्यात येते. त्या काळात चंद्र पृथ्वीच्या थोडा जवळ असायचा, असे एका अहवालात म्हटले आहे. आता एका दिवसात 24 ऐवजी 25 तास असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत असली तरी हे सर्व काही एकाच दिवसात अचानक होईल असे नाही. सुमारे 200 दशलक्ष वर्षांनंतर, एक दिवस 25 तासांचा असेल, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत.
The post भविष्यात एका दिवसात 24 ऐवजी असणार 25 तास? appeared first on पुढारी.

बर्लिन : कधी कधी आपल्या कल्पनेपेक्षाही वेगळे संशोधन होत असते. अशी अनेक संशोधने ही बहुतांशी भविष्यातीलच असतात हे विशेष! एका दिवसात किती तास असतात? असे विचारले तर 24 तास हे उत्तर अगदी सहजपण कोणीही देऊ शकेल; पण एका दिवसात 25 तास असतील असं कोणी सांगितलं तर? थोड आश्चर्य वाटलं ना. पण वैज्ञानिकांनी असा दावा केला …

The post भविष्यात एका दिवसात 24 ऐवजी असणार 25 तास? appeared first on पुढारी.

Go to Source