‘महिलांनी कमीत कमी ८ मुले जन्माला घालावी’

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन महिलांना किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. रशियन महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत आणि मोठ्या कुटुंबांना ‘आदर्श’ बनवावे. जागतिक रशियन पीपल्स कौन्सिलला संबोधित करताना पुतिन यांनी हे वक्तव्य केले आहे. येत्या काही दशकांत रशियाची लोकसंख्या वाढवण्याचे ध्येय आपल्याला ठेवावे लागेल, असे पुतीन यांनी … The post ‘महिलांनी कमीत कमी ८ मुले जन्माला घालावी’ appeared first on पुढारी.
#image_title
‘महिलांनी कमीत कमी ८ मुले जन्माला घालावी’


पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन महिलांना किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. रशियन महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत आणि मोठ्या कुटुंबांना ‘आदर्श’ बनवावे. जागतिक रशियन पीपल्स कौन्सिलला संबोधित करताना पुतिन यांनी हे वक्तव्य केले आहे.
येत्या काही दशकांत रशियाची लोकसंख्या वाढवण्याचे ध्येय आपल्याला ठेवावे लागेल, असे पुतीन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आपल्याकडे आजही मोठ्या घराण्यांवर विश्वास ठेवणारे अनेक समाज आहेत. त्यांना चार, पाच किंवा अधिक मुले आहेत. आपल्या आजी, पणजींना ७-८ किंवा त्याहून अधिक मुले असायची. रशियाने मोठ्या कुटुंबांना जीवनपद्धती म्हणून स्वीकारून अशा परंपरा जिवंत ठेवण्याची गरज आहे. कुटुंब हा केवळ राज्याचा किंवा समाजाचा आधार नसून धार्मिक दृष्टिकोनातूनही योग्य आहे. सर्व धर्मांनी कुटुंबे मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हे युगानुयुगे रशियाचे भविष्य असावे, असेही पुतिन यांनी म्हटले आहे.
युक्रेनसोबतच्या युद्धाला २० महिन्यांहून अधिक काळ लोटला असताना पुतिन यांनी हे वक्तव्य केले आहे. या युद्धात लाखो रशियन सैनिक मारले गेले आहेत. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला होता की युक्रेनसोबतच्या युद्धात तीन लाखांहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी, रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS ने १ जानेवारी २०२३ रोजी देशाची लोकसंख्या १४.६४ कोटी होती असे सांगितले होते; जी पुतिन राष्ट्रपती बनल्यानंतर १९९९ च्या आकडेवारीपेक्षा कमी आहे.
हेही वाचा : 

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींसोबतचे फोटो केले शेअर
कार्बन उत्सर्जन 45 टक्क्यांनी घटविण्याचे भारताचे लक्ष्य
भारतात २०२८ मध्ये COP33 परिषद – PM मोदींचा प्रस्ताव
युद्धविराम संपला : इस्रायलची हमास विरोधात मोहीम तीव्र; ६ पॅलेस्टिनी नागरिक ठार

The post ‘महिलांनी कमीत कमी ८ मुले जन्माला घालावी’ appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन महिलांना किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. रशियन महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत आणि मोठ्या कुटुंबांना ‘आदर्श’ बनवावे. जागतिक रशियन पीपल्स कौन्सिलला संबोधित करताना पुतिन यांनी हे वक्तव्य केले आहे. येत्या काही दशकांत रशियाची लोकसंख्या वाढवण्याचे ध्येय आपल्याला ठेवावे लागेल, असे पुतीन यांनी …

The post ‘महिलांनी कमीत कमी ८ मुले जन्माला घालावी’ appeared first on पुढारी.

Go to Source