खा. शरद पवार उद्या सातारा दौर्‍यावर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे खा. शरद पवार हे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जतमधील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा दौरा औत्सुक्याचा बनला आहे. खा. शरद … The post खा. शरद पवार उद्या सातारा दौर्‍यावर appeared first on पुढारी.
#image_title

खा. शरद पवार उद्या सातारा दौर्‍यावर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे खा. शरद पवार हे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जतमधील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा दौरा औत्सुक्याचा बनला आहे.
खा. शरद पवार हे रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. सकाळी 10 वाजता सर्कीट हाऊस पुणे येथून सातार्‍याकडे मार्गस्थ होणार आहेत. दुपारी 12.30 वाजता सर्कीट हाऊस सातारा येथे त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी 12.30 ते 2.30 यावेळेत खा. शरद पवार हे सर्कीट हाऊस सातारा येथे थांबणार असून जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. शासकीय विश्रामगृहानंतर दुपारी 2.30 वाजता जकातवाडी ता. सातारा येथील माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
जकातवाडीतील कार्यक्रमानंतर शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर माजी आ. प्रभाकर घार्गे कुटुंबियांच्या विवाह समारंभास उपस्थित राहून त्यानंतर खा. शरद पवार हे पुण्याकडे रवाना होणार आहेत. खा. शरद पवार यांच्या सातारा दौर्‍याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खा. शरद पवार काय कानमंत्र देतात? तसेच अगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणीसह जिल्ह्यातील विविध विषयावरही ते पदाधिकार्‍यांबरोबर चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.
The post खा. शरद पवार उद्या सातारा दौर्‍यावर appeared first on पुढारी.

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे खा. शरद पवार हे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जतमधील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा दौरा औत्सुक्याचा बनला आहे. खा. शरद …

The post खा. शरद पवार उद्या सातारा दौर्‍यावर appeared first on पुढारी.

Go to Source