सांगली: अशोक गोरड यांची प्रकृती खालावली; धनगर समाजाने जत -सांगली रस्ता रोखला
जत : पुढारी वृत्तसेवा: धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, तसेच विविध मागण्यांसाठी जत तहसील कार्यालयासमोर उपोषणकर्ते अशोक गोरड हे पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या उपोषणाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे भेट देऊन उपोषणकर्त्याला राज्य सरकारच्यावतीने आश्वस्त करतील, अशी अपेक्षा होती. पण भेटण्यास पालकमंत्र्यांनी नकार देत उदासीनता दाखवली. त्यानंतर युवकांनी नाराजी व्यक्त करत जत सांगली रोडवर रस्तारोको करत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. Dhangar reservation
दरम्यान, आमदार विक्रम सावंत यांनी उपोषण कर्त्याची भेट घेत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासन दिले. खासदारांनी मात्र उपोषणाकडे पाठ फिरवली असल्याचे आंदोलनस्थळी समाजबांधवांमध्ये चर्चा सुरू होती. आंदोलनस्थळी उपोषणकर्ते अशोक गोरड यांची प्रकृती खालावल्याने यांना सलाईन लावण्यात आली आहे. Dhangar reservation
यावेळी विक्रम ढोणे म्हणाले की, धनगर समाजाची अंमलबजावणीची मागणी असताना राज्य सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षण समावेशाची अभ्यास समिती गठित करून धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस पाठवण्याची मागणी समाज्याच्या वतीने करण्यात आली.
पाचव्या दिवशी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी सभापती आकराम मासाळ, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, संजय सावंत, आरपीआय नेते संजय कांबळे, सरपंच रमेश साबळे, बंटी दुधाळ, निलेश बामणे आदींनी पाठिंबा दिला. आंदोलनात अशोक बन्नेनवर, विक्रम ढोणे, मारुती सरगर, बाळू पांढरे, प्रवीण गडदे, भाऊसाहेब दुधाळ, किसन टेंगले, शंकर पारेकर, तानाजी कटरे आदींनी सहभागी झाले होते.
हेही वाचा
सांगली : राजारामबापू कारखान्यासमोर स्वाभिमानीचं आंदोलन; पोलिस आणि कार्यकर्त्यात झटापट
सांगली : डफळापूर येथे कॅनॉलचा भरावा फोडल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
सांगली : कृष्णा खोरे पाणी वाटपात बदल केल्यास जनहित याचिका दाखल करू : मुळीक
The post सांगली: अशोक गोरड यांची प्रकृती खालावली; धनगर समाजाने जत -सांगली रस्ता रोखला appeared first on पुढारी.
जत : पुढारी वृत्तसेवा: धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, तसेच विविध मागण्यांसाठी जत तहसील कार्यालयासमोर उपोषणकर्ते अशोक गोरड हे पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या उपोषणाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे भेट देऊन उपोषणकर्त्याला राज्य सरकारच्यावतीने आश्वस्त करतील, अशी अपेक्षा होती. पण भेटण्यास पालकमंत्र्यांनी नकार देत उदासीनता दाखवली. त्यानंतर …
The post सांगली: अशोक गोरड यांची प्रकृती खालावली; धनगर समाजाने जत -सांगली रस्ता रोखला appeared first on पुढारी.