जळगाव: पारोळा – धुळे मार्गावर तीन वाहनांचा अपघात; ३ महिलांचा मृत्यू; २१ जखमी
जळगाव, पुढारी वृत्तसेवा: भरधाव ट्रकने दोन पिकअपला जोराची धडक दिली. या अपघात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले. ही घटना आज (दि.१) दुपारी १२ च्या सुमारास पारोळा – धुळे मार्गावरील विचखेडा फाट्याजवळ घडली. रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) यांचा जागीच तर चंदनबाई गिरासे (वय ६५) यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. या घटनेने बोळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. Jalgaon News
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोळे (ता. पारोळा) येथून चीलाणे (ता. शिंदखेडा) येथे एका अंत्यसंस्कारासाठी पिकअपमधून महिला आणि पुरूष निघाले होते. तर पारोळ्याकडून धुळेकडे लोखंडी रोल असलेला एक ट्रक निघाला होता. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने त्याने पिकअपला व आणखी एका नवीन पासिंगसाठी जाणाऱ्या नवीन पिकअपला जोराची धडक दिली. या अपघातात एकूण २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच बोळे परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती. Jalgaon News
या अपघातात रंजित सुरधिंग गिरासे (60), भरत रामभाऊ गिरासे (65), राजेराबाई सखरा कोळी (45), भिमकोर सत्तरसिंग गिरासे (50), भुराबाई मोनसिंग गिरासे (4०), भुराबाई तात्या गिरासें (40), रेखाबाई अधिकार गिरासे (50), नानाभाऊ सुभाष गिरासे (55), भटाबाई साहेबराव गिरासे (45), सुनिता नारायण गिरासे (44), भुरावाई भिमसिंग गिरासे, अजतसिंग दादाभाऊ गिरासे (50), सय्यद कियाखत (मालेगांव) 21 (न्यू पिक अप चालक), हिराबाई विजयसिंग गिरासे (५०), भिमकोर बाई जगत गिरासे (60), भगवानसिंग नवलसिंग गिरासे (65), रजेसिंग भारतसिंग गिरासे (55, पिक अप चालक) रूपसिंग नवलसिंग गिरासे (60), दखाबाई रूपसिंग गिरासे (55), राजेबाई साहेबराव कोळी (45) जखमी झाले आहेत. जखमींवर प्रथमोपचार करून गंभीर जखमींना धुळे येथे हलविण्यात आले आहे. यावेळी माजी आ. डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
हेही वाचा
जळगाव: ७ दुचाकींसह चोरटा अटक; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
जळगाव : ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न, प्रकार सीसीटीव्हीत कैद
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकरी आक्रोश मोर्चा
The post जळगाव: पारोळा – धुळे मार्गावर तीन वाहनांचा अपघात; ३ महिलांचा मृत्यू; २१ जखमी appeared first on पुढारी.
जळगाव, पुढारी वृत्तसेवा: भरधाव ट्रकने दोन पिकअपला जोराची धडक दिली. या अपघात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले. ही घटना आज (दि.१) दुपारी १२ च्या सुमारास पारोळा – धुळे मार्गावरील विचखेडा फाट्याजवळ घडली. रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) यांचा जागीच तर चंदनबाई …
The post जळगाव: पारोळा – धुळे मार्गावर तीन वाहनांचा अपघात; ३ महिलांचा मृत्यू; २१ जखमी appeared first on पुढारी.