सरकारची नियत साफ नाही : यशोमती ठाकूर

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणामुळे विकास ठप्प झाला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय असो की, स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक यांच्या समस्या असो, याबाबत सरकारची नियत साफ नाही, असा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी आज (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी बोलताना केला. महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार … The post सरकारची नियत साफ नाही : यशोमती ठाकूर appeared first on पुढारी.
#image_title

सरकारची नियत साफ नाही : यशोमती ठाकूर

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणामुळे विकास ठप्प झाला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय असो की, स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक यांच्या समस्या असो, याबाबत सरकारची नियत साफ नाही, असा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी आज (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी बोलताना केला.
महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळाला त्यांनी आज (दि.१) भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सरकारला स्वस्त धान्य वितरण व्यवस्था मोडीत काढायची आहे. पण आम्ही तुमच्या सोबत असून हा प्रश्न विधानसभेच्या सभागृहात माडंणार असल्याचे आमदार ठाकूर यांनी यावेळी सांगितले.  यावेळी आमदार बळवंत वानखडे उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, हे अवलक्षणी सरकार आहे. हे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून विकासाला खिळ बसली आहे. खोटी आश्वासने, विकासाचा फक्त आभास, निधी वाटपात प्रचंड पक्षपात करणाऱ्या या सरकारच्या मनातचं खोटं आहे. शेतकरी मरतोय मरू दे, व्यवसाय बुडतात बुडू दे, फक्त आपलं चागभलं झालं बस्स.. इतकंच या सरकारचं धोरण असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. सरकार भलेही शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असेल, स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक यांच्याविषयी सरकारच्या मनात खोटं असली तरी आम्ही मात्र तुमच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वचनबद्ध आहोत. गरज पडली तर यासाठी रस्त्यावर उतरू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच हा प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : 

Nashik News : भाजप सरकारविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा
Ajit Pawar : आम्हाला कायम गाफील का ठेवले ? : अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
Manoj Jarange Patil …त्याला फक्त फुले आणि जेसीबी दिसतंय काय? : जरांगे -पाटील यांचा भुजबळांना टोला

The post सरकारची नियत साफ नाही : यशोमती ठाकूर appeared first on पुढारी.

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणामुळे विकास ठप्प झाला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय असो की, स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक यांच्या समस्या असो, याबाबत सरकारची नियत साफ नाही, असा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी आज (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी बोलताना केला. महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार …

The post सरकारची नियत साफ नाही : यशोमती ठाकूर appeared first on पुढारी.

Go to Source