हिंगोली : डिग्रस कोंढुर येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस कोंढुर येथे एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कयाधू नदीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवले. ही घटना आज (दि. १) घडली. अमरदास संजय सूर्यवंशी (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिग्रस कोंढुर येथील अमरदास सूर्यवंशी हा शेती करत होता. घरी आई, वडील, भाऊ असे … The post हिंगोली : डिग्रस कोंढुर येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले appeared first on पुढारी.
#image_title

हिंगोली : डिग्रस कोंढुर येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस कोंढुर येथे एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कयाधू नदीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवले. ही घटना आज (दि. १) घडली. अमरदास संजय सूर्यवंशी (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिग्रस कोंढुर येथील अमरदास सूर्यवंशी हा शेती करत होता. घरी आई, वडील, भाऊ असे कुटुंब आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. कळमनुरी तालुक्यात झालेल्या आंदोलनामध्येही त्यांनी सहभाग नोंदवला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता.
दरम्यान, आज सकाळी दहा वाजता अमरदास शेताकडे जातो, असे सांगून निघाला होता. मात्र तो शेतात पोहोचलाच नाही. त्याने कयाधू नदीच्या पात्रात पाण्यात उडी मारली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अमरदास याला पाण्याच्या बाहेर काढून आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केली आहे. अमरदास याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जीवन संपवत असल्याचे नमूद केले आहे. आखाडा बाळापूर पोलिासांत गुन्हा नोंद झाला आहे.
हेही वाचा 

हिंगोली: हिवरा जाटू येथे पालकमंत्र्यांकडून पिकांची पाहणी, गोजेगाव येथील मृताच्या कुटुंबाला धनादेश सुपूर्त
हिंगोली : बस चालकाचा हृदयविकाराने मृत्यू, गाडी सुरक्षित उभी करून सोडले प्राण
हिंगोली : जिंतूर- औंढा मार्गावरील धारफाटा येथे ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

The post हिंगोली : डिग्रस कोंढुर येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले appeared first on पुढारी.

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस कोंढुर येथे एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कयाधू नदीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवले. ही घटना आज (दि. १) घडली. अमरदास संजय सूर्यवंशी (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिग्रस कोंढुर येथील अमरदास सूर्यवंशी हा शेती करत होता. घरी आई, वडील, भाऊ असे …

The post हिंगोली : डिग्रस कोंढुर येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले appeared first on पुढारी.

Go to Source