दुर्दैवी | पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरून मृत्यू

पुणे : इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटी येथे पंधरा वर्षीय मुलगी विहिरीत पाय घसरुन बुडाली यात तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय..सारिका पिराजी शिंदे असं या मुलीचं नांव असून आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सारिका या विहिरीवरती पाणी आणण्यासाठी गेली होती.. पाण्यावर आणण्यासाठी गेलेली मुलगी माघारी येत नाही म्हणून सकाळी साडेसात वाजल्यापासून या मुलीचा शोध घेतला जात होता तबल साडेसहा तासानंतर या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
सारिका पिराजी शिंदे वय 15 वर्षे (राहणार परतुर,ता. परतुर जिल्हा. जालना) ही मुलगी आज सकाळी साडेसात वाजता (राजवडी ता. इंदापूर) येथील विहिरी वरती पाणी भरणे कामी गेली असताना पाय घसरून पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.. पोलीस प्रशासन महसूल यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतील पाण्याचा साठा बाहेर काढून या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय.
हेही वाचा
पुरंदर तालुक्यात 82 टँकरने पाणीपुरवठा
Nashik Teacher Constituency Election | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त ही 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य
भंडारा: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांची बोट बुडाली
