पुरंदर तालुक्यात 82 टँकरने पाणीपुरवठा

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले असले, तरी पुरंदर तालुक्यातील दुष्काळाचे सावट कमी झालेले नाही. तीव्र पाणीटंचाईमुळे पुरंदर तालुक्यातील 35 गावठाणांसह 321 वाड्या-वस्त्यांवर जवळपास 82 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शहरी तसेच ग्रामीण भागात तीव्र होत चालला आहे. मागील वर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने …

पुरंदर तालुक्यात 82 टँकरने पाणीपुरवठा

वाल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले असले, तरी पुरंदर तालुक्यातील दुष्काळाचे सावट कमी झालेले नाही. तीव्र पाणीटंचाईमुळे पुरंदर तालुक्यातील 35 गावठाणांसह 321 वाड्या-वस्त्यांवर जवळपास 82 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शहरी तसेच ग्रामीण भागात तीव्र होत चालला आहे.
मागील वर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला होता.
केंद्रस्तरीय समितीने दुष्काळाची पाहणी देखील केली. परंतु, उपाययोजना झाल्या नाहीत. पुरंदर तालुक्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, विविध गावांना पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, चाराडेपो सुरू करावा, बंद पाणी योजना तातडीने चालू कराव्यात, अशा मागण्या नागरिकांनी शासनाकडे वारंवार केल्या. मात्र, प्रशासनाने त्यावर ठोस उपाययोजना केली नाही. पावसाळा सुरू होण्याआधी तालुक्यात एकूण 42 गावठाणांसह 363 वाड्या-वस्त्यांवर 93 टँकरच्या माध्यमातून 288 खेपा सुरू होत्या.
पावसाळा सुरू झाल्यानंतर 42 गावांत सुरू असलेले 7 टँकरची संख्या कमी होऊन 35 झाली आहे. 363 वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेले टँकर आता 321 वाड्या-वस्त्यांवर सुरू आहेत, अशी माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
टँकर सुरू असलेली गावे
वाल्हे, वागदरवाडी, रिसे, पिसे, राजुरी, सोनेरी, साकुर्डे, जवळार्जुन, दौंडज, दिवे, झेंडेवाडी, साकुर्डे, पांडेश्वर, खळद, बोपगाव, नायगाव, सुकलवाडी, पिंगोरी, दौंडज, आंबळे, सिंगापूर, गुर्‍होळी, राख, नावळी, मावडी क.प., आडाचीवाडी, कुंभारवळण, एकतपूर, खानवडी.
पुरंदर तालुक्यात आजअखेर 35 गावे व संबंधित वाड्यांना एकूण 82 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर 7 गावांतील 9 टँकर बंद झाले. आगामी काळात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर टँकरची संख्या आणखी कमी होईल.
– सचिन घुबे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, पुरंदर

हेही वाचा

Nashik Teacher Constituency Election | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त ही 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य
भंडारा: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांची बोट बुडाली
Weather Forecast | पाऊस पश्चिम किनारपट्टीला झोडपणार, गुजरातमध्ये पुराची शक्यता