बिद्री : Bharat Live News Media वृत्तसेवा कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने २१ जून रोजी अचानक तपासणीची केलेली कारवाई मला आवडलेली नाही. बिद्री कारखाना हा के. पी. पाटील यांच्या मालकीचा नाही. तो ६५ हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे. काही शंका असल्यास कारखान्याची तपासणी करण्यापेक्षा माजी आमदार के. पी. पाटील यांच्या घराची इन्कमटॅक्स किंवा इडीने तपासणी करायला हवी होती. असा निशाना सरकारवरच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘Bharat Live News Media’ शी बोलताना साधला.
ना. मुश्रीफ म्हणाले, महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात आंम्ही सर्व होतो. निवडणूकीच्या विजयानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनी महाविकास आघाडीचे खासदार शाहू छत्रपती यांचे स्वागत व सत्कार केला. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रवेश केला असा अर्थ होत नाही. तरीही के. पी. पाटील यांना मी निवडणुकीचा निकाल ताजा असताना अशी कृती करणे मला आवडले नाही तशी तीव्र भावना मी त्यांना बोलून दाखविली होती. पण राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणी कारवाईचा मी निषेध करतो. के. पी. पाटील महाविकास आघाडीकडे जात आहेत. हे गृहीत धरून हे जर कारवाई करीत असाल तर बिद्री कारखाना हा के. पी. पाटील यांच्या मालकीचा नाही. तो सभासदांच्या मालकीचा आहे. कारखान्याची तपासणी करण्यापेक्षा शंका असल्यास माजी आमदार के. पी. पाटील यांच्या घराची इन्कमटॅक्स किंवा इडीने तपासणी करायला हवी होती. असा टोला लगावला.
राजकारणामध्ये असे करून कधी यशस्वी होता येत नाही. राजकारणाच्या मैदानामध्ये चितपट किंवा पाट टेकवूनच लढाई जिंकता येते. अशा कारवाया करून नाही. यामुळे उलट के. पी. पाटील यांनाच अधिक सहानुभूती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही ते म्हणाले.
हेही वाचा :
Stock Market Updates | घसरणीनंतर बाजारात रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलन भरकवटण्याचा डाव : मनोज जरांगे-पाटील
S. Jaishankar| कॅनडाच्या संसदेत दहशतवाद्याला श्रद्धांजली; एस. जयशंकर संतापले