पुढील ५ दिवस पावसाचे, पश्चिम किनारपट्टीला झोडपणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पुढील ५ दिवस पाऊस पश्चिम किनारपट्टीला झोडपणार आहे. आजपासून (दि.२४ जून) शुक्रवार २८ जूनपर्यंत देशाच्या पश्चिम किनारपट्टी प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता (Weather Forecast) असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
सोमवार २४ जून ते शुक्रवार २८ जूनपर्यंत राज्यातील कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, गोवा, आणि अरुणाचल प्रदेशातील घाट भागात पुढील ५ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज २४ जून रोजी गुजरात राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. सोमवार २४ आणि मंगळवार २५ जूनला अंदमान आणि निकोबार बेट, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या ठिकाणी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. तर २४ जून ते २६ दरम्यान दक्षिण किनारपट्टी अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे याठिकाणी देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता (Weather Forecast) देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
Heavy to very heavy rainfall very likely along the West Coast during next 5 days.
For more details, please visit https://t.co/B6IWnVqGMn pic.twitter.com/bZCRyfr3rI
— India Meteorological Department (@Indiametdept) June 24, 2024
Weather Forecast : गुजरातमध्ये कमी ते मध्यम स्वरूपाच्या पुराची शक्यता
पुढील २४ तासांत गुजरातमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून, बहुतांशी भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. सौराष्ट्राचा दक्षिण भाग, कच्छचा मध्य भाग, गुजरात राज्याच्या दक्षिणेकडील भागांत अतिवृष्टीमुळे कमी ते मध्यम स्वरूपाच्या पुराची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
गुजरात क्षेत्र में 24 और 25 जून, 2024 को अलग-अलग स्थानों पर भारी (64.5-115.5 मिलीमीटर) से बहुत भारी वर्षा (115.5-204.4 मिलीमीटर) से अत्यंत भारी वर्षा (>204.4 मिलीमीटर) होने की संभावना है। pic.twitter.com/v8zExIFVRQ
— India Meteorological Department (@Indiametdept) June 24, 2024
