दक्षिण कोरिया: बॅटरी कंपनीला भीषण आग; २० जणांचा मृत्यू
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियामधील लिथियम बॅटरी उत्पादन करणाऱ्या कारखान्यात आज (दि.२४) सकाळी 10.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) आग लागली. या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांच्या दुजोराने योनहाप वृत्तसंस्थेने दिली आहे.
सेऊलच्या दक्षिणेकडील ह्वासेओंग येथील बॅटरी उत्पादक कंपनी एरिसेलमध्ये सकाळी 10.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) आग लागली. सुमारे 35 हजार युनिट्स असलेल्या गोदामातील बॅटरी सेलचा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली, असे स्थानिक अग्निशमन अधिकारी किम जिन-यंग यांनी दिली.
योनहॅपने सांगितले आहे की, सुमारे 20 मृतदेह सापडले आहेत, परंतु किमने एका दूरदर्शन ब्रीफिंगमध्ये सांगितले की 9 लोक मरण पावले आणि इतर 4 जखमी झाले. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा
S. Jaishankar| कॅनडाच्या संसदेत दहशतवाद्याला श्रद्धांजली; एस. जयशंकर संतापले
उष्माघाताचा कहर : हज यात्रेतील मृतांची संख्या १,३०१ वर