वर्षभरात 128 अपघात; 31 जण मृत्युमुखी, 135 गंभीर जखमी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे 11 लाखांहून अधिक प्रवाशांची दररोज येजा करण्यासाठी या शहरांना जोडणार्‍या रहदारीची प्रमुख नाळ असलेल्या पीएमपीएलच्या बसेसचे गेल्या एप्रिल ते मार्च दरम्यान तब्बल 128 अपघात झाले असून त्यात 31 जणांचा मृत्यृ झाला आहे तर 135जण गंभीर जखमी झाले आहेत. ठेकेदार अकार्यक्षम? ठेकेदारामार्फत सेवा देणार्‍या बसगाडयामध्ये अपघाताचे …

वर्षभरात 128 अपघात; 31 जण मृत्युमुखी, 135 गंभीर जखमी

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे 11 लाखांहून अधिक प्रवाशांची दररोज येजा करण्यासाठी या शहरांना जोडणार्‍या रहदारीची प्रमुख नाळ असलेल्या पीएमपीएलच्या बसेसचे गेल्या एप्रिल ते मार्च दरम्यान तब्बल 128 अपघात झाले असून त्यात 31 जणांचा मृत्यृ झाला आहे तर 135जण गंभीर जखमी झाले आहेत.
ठेकेदार अकार्यक्षम?
ठेकेदारामार्फत सेवा देणार्‍या बसगाडयामध्ये अपघाताचे प्रमाण जास्त आहे. गंभीर अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणार्‍यांची वाढ लक्षात घेता पीएमपीएल बससेवा अपघातात अव्वल ठरत असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा हद्दीतील 380 मार्गांवर सुरु असून दिवसभरात यामार्गांवर 1700 बसेस धावतात. पीएमपीएलकडे एकूण 2 हजार 89 गाडया असून त्यामध्ये 991 गाडया या स्वमालकीच्या तर एक हजार 98 गाडया भाडेतत्वावरील आहेत.
पीएमपीच्या अपघातात होणारी वाढ लक्षात घेता प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. मात्र ठेकेदारामार्फत चालविणार्‍या जाणार्‍या बसचे अपघात सार्वधिक आहेत गेल्या आर्थिक वर्षात पीएमपीचे 131 अपघात झाले आहेत. 31 जण मृत्यूमुखी पडलेत तर 35 जण गंभीररित्या जखमी, 65 जण किरकोळ जखमी झाले आहेत. सन 2022-23 मध्ये पीएमपीच्या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला.
याबाबत वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, की अपघात झाल्यानंतर गाडीची तपासणी करुन अपघात कसा झाला याची माहिती घेतली जाते. बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचे समोर आल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते. भाड्याने घेतलेल्या बसच्या अपघाताची चौकशी करुन दोषी चालकावर कारवाई करण्याची शिफारस ठेकेदाराकडे केली जाते. ती समाधानकारक नसल्यामुळे ठेकेदारांच्या गाडयांच्या अपघातात वाढ होत आहे.
पीएमपीच्या स्वमालकीच्या बसचा अपघात झाल्यास संपुर्ण चौकशी केल्यानतंर बसचालकाला निलंबित केली जाते. संबंधित त्या भागातील वाहतूक पोलिसांना बोलवुन त्यांच्याकडुन प्रबोधन केले जाते. तसेच आमच्याकडे वेगळी ट्रेनिंग देण्यात येते. तसेच वाहनचालकांकडून आठवडया मिटींग घेतली जाते. अथवा अपघाताचे ते काही स्पॉट आहेत.त्याठिकाणी आपल्याकडुन परिपत्रक लावण्यात आली आहे. त्या भागात धिम्य गतीने बस चालवावी.
– सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक ,पुणे

हेही वाचा

सर्वोच्‍च न्‍यायालयाने केजरीवालांना दिला ‘सबुरी’चा सल्‍ला
CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द
तरुण, प्रौढ वयात माणसाला किती तास झोप हवी?