मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा उद्या (दि.२४) होणारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. ते कोल्हापूर शाश्वत विकास परिषदेसाठी येणार होते. राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद येत्या २५ जून रोजी कोल्हापूर येथील सयाजी हॉटेल मधील विक्टोरिया सभागृहात सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होत आहे. …

मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा उद्या (दि.२४) होणारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. ते कोल्हापूर शाश्वत विकास परिषदेसाठी येणार होते.
राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद
राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद येत्या २५ जून रोजी कोल्हापूर येथील सयाजी हॉटेल मधील विक्टोरिया सभागृहात सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी या परिषदेतून  सामंजस्य करार आणि घोषणाही होणार आहेत. या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही येणार होते. त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे.
रिक्षा व टॅक्सीचालक आंदोलन करणार का? 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादिवशी कोल्हापूरमधील रिक्षा व टॅक्सीचालक संघटनांनी रिक्षा बंद ठेवत विलंब दंड आकारणीविरोधात आंदोलन जाहीर केले होते. कोल्हापूर शहरातील सुमारे 16 हजारांवर रिक्षा व टॅक्सी चालक या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा रिक्षा व टॅक्सी वाहनधारक समितीचे विजय देवणे, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, सतीशचंद्र कांबळे यांनी संयुक्तपणे शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्यानंतर शहरातील रिक्षा व टॅक्सीचालक संघटना आंदोलन करणार की नाही हे अद्याप रिक्षा व टॅक्सीचालक संघटनांनी जाहीर केलेले नाही.
हेही वाचा 

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी 12 जुलैचा अल्टिमेटम
उद्या कोल्हापूर बंद; आज मध्यरात्रीपासून रिक्षा, टॅक्‍सी बंद
कोल्हापूर: ‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड