मराठा आरक्षण आंदोलन भरकवटण्याचा डाव : जरांगे-पाटील
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलन भरकटवण्याचा डाव सुरु आहे. त्यांना दंगली घडवून आणायच्या आहेत, असा आराेप करत आपल्या भविष्यासाठी तयार राहा. मागे हटू नका, तुम्ही तुमची एकजुट दाखवा. येत्या सहा जुलैला होणाऱ्या मराठा जनजागृती रॅलीत सहभागी व्हा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.२४) माध्यमांशी बोलताना केले. (Maratha Reservation)
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलत असताना जरांगे-पाटील जातीयवाद निर्माण करत आहोत, असा आरोप केला होता. मनोज जरांगे-पाटील यांनीही याला सडेतोड उत्तर दिले होते. (Maratha Reservation)
आपली जात संकटात सापडली आहे
छत्रपती संभाजीनगरमधून माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, येत्या सहा जुलै रोजी होणााऱ्या मराठा जनजागृती रॅलीमध्ये सहभागी व्हा. आता आपण जशास तसे उत्तर द्यायच. आपली जात संकटात सापडली आहे. आपल्या भविष्यासाठी तयार राहा. आता आबोसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे पुन्नरुच्चार त्यांनी केला.
मेलो तरी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार
जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण तुम्ही मागे हटू नका. तुम्ही तुमची एकजुट दाखवा. आपल्या भविष्यासाठी एक व्हा. मराठा कडवट आहे भित्रा नाही. मराठ्यांनी मराठ्यांवरच आरोप करणं बंद करा असे म्हणतं मी आरक्षणाच्याच बाजुने उभा राहणार आहे. मी मेलो तरी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
Maratha Reservation : ‘सगेसोयरे’ अधिसूचना अंतिम करण्याच्या हालचाली
Maratha Reservation | आरक्षणाबाबत मराठा उमेदवारांना भूमिका मांडावी लागणार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव