Elon Musk बनले १२ व्या मुलाचे बाप

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था: स्पेस-एक्स आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या १२ व्या मुलाचे बाप बनले आहेत. ब्लूमबर्गने माहितीनुसार, या मुलाचा जन्म त्यांची पार्टनर आणि न्यूरालिंक मॅनेजर शिवॉन गिलीस यांच्यापासून झाला. वर्षाच्या सुरुवातीला मुलाचा जन्म झाला. मस्क यांनी ही माहिती गुप्त ठेवली होती. आतापर्यंत मस्क आणि शिवोन यांनी याबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. …

Elon Musk बनले १२ व्या मुलाचे बाप

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था: स्पेस-एक्स आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या १२ व्या मुलाचे बाप बनले आहेत. ब्लूमबर्गने माहितीनुसार, या मुलाचा जन्म त्यांची पार्टनर आणि न्यूरालिंक मॅनेजर शिवॉन गिलीस यांच्यापासून झाला. वर्षाच्या सुरुवातीला मुलाचा जन्म झाला. मस्क यांनी ही माहिती गुप्त ठेवली होती.

आतापर्यंत मस्क आणि शिवोन यांनी याबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. यापूर्वी या दोघांना २०२२ मध्ये जुळी मुले झाली होती. याशिवाय मस्क यांच्या आठ मुलांपैकी पाच मुले त्यांची पहिली पत्नी आणि लेखिका जस्टिन मस्क आणि तीन मुले संगीतकार ग्रिम्स यांच्यापासून झाली होती.
सध्या जग कमी लोकसंख्येच्या संकटाचा सामना करत आहे आणि चांगला बुद्ध्यांक असलेल्या लोकांना मुले असणे आवश्यक आहे, असे मस्क यांनी यापूर्वी वक्तव्य केले होते.