अल्पवयीनावर गोळीबार करणारे दोघे ताब्यात; पूर्ववैमनस्यातून घडलेला प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील अभिरुची मॉल परिसरात घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोन साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत एका मुलाने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 22 जून रोजी सिंहगड …

अल्पवयीनावर गोळीबार करणारे दोघे ताब्यात; पूर्ववैमनस्यातून घडलेला प्रकार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील अभिरुची मॉल परिसरात घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोन साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत एका मुलाने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 22 जून रोजी सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल परिसरात शनिवारी सायंकाळी अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मुलावर गोळीबार केला. पिस्तुलातून गोळीबार झाल्यानंतर मुलगा वाकल्याने तो बचावला, अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली.
सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांनी पथक तयार केले. पोलिस अंमलदार आबा उत्तेकर, शिवाजी क्षीरसागर व स्वप्नील मगर यांना गोळीबार करून पळालेला दोघेजण शिवणेत येणार असल्याचे समजले. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव करण जामदार असे सांगितले व त्यानेच गोळीबार केल्याची माहिती दिली. त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली असून, 25 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

S. Jaishankar| कॅनडाच्या संसदेत दहशतवाद्याला श्रद्धांजली; एस. जयशंकर संतापले
विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान कोण भरुन देणार? किरण मानेंची NEET पेपरफुटीवर पोस्ट
Nashik Crime News | कुजलेल्या अवस्थेत आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह