कॅनडाच्या संसदेत दहशतवाद्याला श्रद्धांजली; एस. जयशंकर संतापले

टोरँटो/नवी दिल्ली, वृत्तसंस्था: कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याला श्रद्धांजली वाहण्यात आल्याच्या घटनेचे भारतातून पडसाद उमटले आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कनिष्क विमान स्फोटाची आठवण करून कॅनडाला दहशतवाद काय असतो ते समजावण्याचा प्रयत्न (S. Jaishankar) केला. कनिष्क विमान स्फोटाचा ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त जयशंकर यांनी त्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद खपवून …

कॅनडाच्या संसदेत दहशतवाद्याला श्रद्धांजली; एस. जयशंकर संतापले

टोरँटो/नवी दिल्ली, वृत्तसंस्था: कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याला श्रद्धांजली वाहण्यात आल्याच्या घटनेचे भारतातून पडसाद उमटले आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कनिष्क विमान स्फोटाची आठवण करून कॅनडाला दहशतवाद काय असतो ते समजावण्याचा प्रयत्न (S. Jaishankar) केला.
कनिष्क विमान स्फोटाचा ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त जयशंकर यांनी त्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, की दहशतवादाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी (S. Jaishankar) कॅनडाला दिला.
तिकडे व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासानेही बॉम्बस्फोटातील मृतांच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. कॅनडाच्या संसदेतच मूळचे भारतीय खासदार चंद्रा आर्य यांनी या कृत्याचा निषेध केला होता, हे येथे उल्लेखनीय !(S. Jaishankar)