आम्ही पहिल्यापेक्षा तीनपट अधिक मेहनत करणार : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली ; Bharat Live News Media ऑनलाईन आजपासून १८ व्या लोकसभेला सुरुवात होत आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडली. ही निवडणूकही खूप महत्त्वाची ठरली आहे कारण स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा लोकसभेत देशाने एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आम्ही यापुढेही पहिल्यापेक्षा तीनपट अधिक मेहनत करणार असल्याचेही त्यांनी म्हंटलंय, संसदीय अधिवेशनाआधी संसद भवन परिसरातून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले.
#WATCH | PM Narendra Modi says, “…The 18th Lok Sabha is starting today. The world’s largest election was conducted in a very grand and glorious manner… This election has also become very important because for the second time after independence, the people of the country have… pic.twitter.com/bASHVtfh3S
— ANI (@ANI) June 24, 2024
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ व्या लोकसभेत युवा खासदारांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. देश चालवण्यासाठी सहमती अत्यंत गरजेची होती. तिसऱ्यांदा एकाच सरकारला सेवा करण्याची संधी जनतेने दिल्यांचे सांगत, आम्ही सर्वांना एकत्र घेउन पुढे जाण्यासाठी ईच्छुक असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी उद्या आणीबाणीच्या काळ्या आठवणींना ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. २५ जून हा कधीच न विसरणारा दिवस आहे. देशाला एका चांगल्या विरोधी पक्षाची आवश्यकता आहे.