पावसाविना व्यावसायिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसानाची शक्यता

तळेगाव : पुढारी वृत्तसेवा : या वर्षी जून महिना संपत आला तरी मावळात पाहीजे तसा पाऊस पडलेला नाही आभाळात काळेकुट्ट ढग येत आहेत परंतु त्या मानाने पाऊस पडत नाही.अधुन मधून उनही पडत आहे. दरवर्षी जूनच्या मध्यापर्यंत धरणे बऱ्यापैकी भरत आलेली असतात. परिसरातील धबधबे वाहण्यास सुरवात झालेली असते. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान मावळ परिसर निसर्गाने बहरलेला …

पावसाविना व्यावसायिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसानाची शक्यता

जगन्नाथ काळे

तळेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : या वर्षी जून महिना संपत आला तरी मावळात पाहीजे तसा पाऊस पडलेला नाही आभाळात काळेकुट्ट ढग येत आहेत परंतु त्या मानाने पाऊस पडत नाही.अधुन मधून उनही पडत आहे. दरवर्षी जूनच्या मध्यापर्यंत धरणे बऱ्यापैकी भरत आलेली असतात. परिसरातील धबधबे वाहण्यास सुरवात झालेली असते.
छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान
मावळ परिसर निसर्गाने बहरलेला असुन लोणावळा-खंडाळा परिसर, बुशी डॕम, कार्ला, भांजे, लोहगड, तुंग विसापूर पवनानगर धरण क्षेत्र परिसर, घोरावाडीश्वर डोंगर, चौराई माता डोंगर आदी ठिकाणी पर्यटकांची तुफान गर्दी होत असते. परंतु पावसाने ओढ धरल्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याचा परिणाम खाद्य पदार्थ विकणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर मोठ्याप्रमाणात होत आहे. यामुळे ते व्यावसायिक हवालदिल झालेले आहेत कारण वर्षातील हेच २-३ महिने पोटापाण्या पुरते मिळविण्याचे असतात पावसाने ओढ धरलीतर त्याच्या पुढे अर्थिक अडचणी राहणार आहे.
शेतकऱ्यांचेही नुकसान
तसेच अशीच पावसाने ओढ धरली तर अनेक ठिकाणी भाताची लागवड प्रक्रिया खोळंबण्याची शक्यता आहे. ज्यांची शेती नदीच्या कडेला आहे त्यांना फारशी अडचण येणार नाही. ते इलेक्ट्रिक उपकरणाच्या सहाय्याने भातशेती साठी नदीवरुन पाणी आणू शकतात परंतु ज्यांची शेती डोंगराच्या, माळरानाच्या, पठाराच्या पायथ्याला आहे आणि पावसावर अवलंबून आहे त्यांची भात लागवड खोळंबण्याची शक्यता आहे कारण माथ्यावरुन वाहत येणाऱ्या पाण्यावर त्यांची भातलागवड अवलंबून असते. यामुळे बळीराजा काळजीत आहे.अद्याप पुरेसा पाऊस न पडल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवला असुन दुग्ध व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच इंदापुर भागातील उजनी धरणक्षेत्र परिसरातील बळीराजाही अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मावळातील पावसावर उजनीचा पाणीसाठा आणि पाणलोट क्षेत्र अवलंबून असते. तरी बळीराजा,दुग्ध व्यावसायिक, छोटे, मोठे व्यावसायिक, पर्यटक पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत.

हेही वाचा

शेतकर्‍यांना अपघात योजनेतून 25.72 कोटी अनुदान
किरकोळ गुन्ह्यांत ज्येष्ठांना होणार नाही अटक !
काय मग, पावसात ट्रेकिंग करताय? तर अशी घ्या काळजी!