अमेरिकेत काही राज्यांत शाळेत मोबाईलवर बंदी

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी घालणारा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही राज्यांनी शाळेत मोबाईलवर बंदी घातली आहे. नव्या शैक्षणिक वर्षात शाळेतील वर्गात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरता येणार नाही. ■ विद्यार्थ्यांना मोबाईल आणि दळणवळण साधणे वापरण्यास बंदी घालण्यासाठी अमेरिकेत १९८० पासून अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. ■ मोबाईल अतिवापरामुळे विद्यार्थ्यांसह युवकांचे मानसिक संतुलन …

अमेरिकेत काही राज्यांत शाळेत मोबाईलवर बंदी

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी घालणारा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही राज्यांनी शाळेत मोबाईलवर बंदी घातली आहे. नव्या शैक्षणिक वर्षात शाळेतील वर्गात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरता येणार नाही.
■ विद्यार्थ्यांना मोबाईल आणि दळणवळण साधणे वापरण्यास बंदी घालण्यासाठी अमेरिकेत १९८० पासून अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले आहेत.
■ मोबाईल अतिवापरामुळे विद्यार्थ्यांसह युवकांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्यामुळेच अमेरिकेत शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात येत आहे.
■ विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याने अमेरिकेतील ७६ टक्के शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
■ शाळांना सोशल मीडियाच्या दुष्परिणामाची माहिती द्यावी लागणार आहे. सोशल मीडियाच्या वापरास मज्जाव करण्याच्या सूचना देण्यात आल्या
आहेत.
■ मोबाईलच्या वापरामुळेच अमेरिकेतील अनेक शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्याचे तपासातून पुढे आले होते. अनेकवेळा मोबाईलवर बंदीसाठी वादविवाद झाले आहेत
■ १९८० च्या दशकापासून शाळांमध्ये संदेशवहन यंत्रणा वापरण्यावर बंदी घालण्यासंदर्भात हालचाली झाल्या आहेत. विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी जाण्याची भीती त्यावेळी व्यक्त करण्यात येत होती.