शेतकर्‍यांना अपघात योजनेतून 25.72 कोटी अनुदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात शेतीव्यवसाय करताना होणार्‍या विविध अपघात प्रकारांमध्ये शेतकर्‍यांना अपंगत्व येणे, मृत्यू होण्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे कवच देण्यात आले आहे. त्यामध्ये गतवर्ष 2023-24 अंतर्गत प्रलंबित असलेल्या एकूण 1 हजार 286 प्रस्तावांसाठी राज्य सरकारने 25 कोटी 72 लाख रुपयांइतकी अनुदान रक्कम मंजूर केली …

शेतकर्‍यांना अपघात योजनेतून 25.72 कोटी अनुदान

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात शेतीव्यवसाय करताना होणार्‍या विविध अपघात प्रकारांमध्ये शेतकर्‍यांना अपंगत्व येणे, मृत्यू होण्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे कवच देण्यात आले आहे. त्यामध्ये गतवर्ष 2023-24 अंतर्गत प्रलंबित असलेल्या एकूण 1 हजार 286 प्रस्तावांसाठी राज्य सरकारने 25 कोटी 72 लाख रुपयांइतकी अनुदान रक्कम मंजूर केली आहे.
शेतीसंबंधी अपघातांसाठी अर्थसहाय्य
शेती करताना वीज पडणे, पूर यासह नैसर्गिक आपत्ती, सर्प-विंचूदंशामुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांचा मृत्यू ओढवतो. काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस तसेच अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकर्‍यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकर्‍यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई-वडील, पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो.
गतवर्ष 2023-24 अंतर्गत प्राप्त 3 हजार 962 प्रस्ताव होते. त्यांपैकी अनुदानासाठी प्रलंबित असलेल्या 1 हजार 286 प्रस्तावांसाठी 25 कोटी 72 लाख रुपये इतकी रक्कम 2024-25 या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून या योजनेंतर्गत सन 2023-24 या वर्षातील मंजूर प्रस्तावांकरिता अनुदान निधी शासनाने वितरित करण्यास मान्यता दिली आहे. अनुदान निधी वितरित करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांवर देण्यात आली आहे.

हेही वाचा

तांत्रिक बिघाडामुळे अद्याप सुनीता विल्यम्स अवकाशातच
काय मग, पावसात ट्रेकिंग करताय? तर अशी घ्या काळजी!
NDCC Bank Nashik | वसुलीविरोधात आज शेतकरी जिल्हा बँकेवर धडकणार