किरकोळ गुन्ह्यांत ज्येष्ठांना होणार नाही अटक !

सांगली : नवीन फौजदारी कायद्यामध्ये पती-पत्नी व्यभिचार, अनैसर्गिक संबंध, आत्महत्येचा प्रयत्न करणे ही कलमे वगळली आहेत. वैद्यकीय अहवाल व न्यायालयाने निर्णय मुदतीत देणे, ऑडीओ व्हिडीओ यंत्राचा वापर, तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या किरकोळ गुन्ह्यामध्ये ६० वर्षांवरील व्यक्तीला अटक न करणे, कमाल शिक्षेपैकी निम्म्या शिक्षेचा कालावधी कारागृहात काढला असेल तर संशयिताला जामीन देणे आदी तरतुदी नवीन …

किरकोळ गुन्ह्यांत ज्येष्ठांना होणार नाही अटक !

अॅड. शिवाजी कांबळे

सांगली : नवीन फौजदारी कायद्यामध्ये पती-पत्नी व्यभिचार, अनैसर्गिक संबंध, आत्महत्येचा प्रयत्न करणे ही कलमे वगळली आहेत. वैद्यकीय अहवाल व न्यायालयाने निर्णय मुदतीत देणे, ऑडीओ व्हिडीओ यंत्राचा वापर, तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या किरकोळ गुन्ह्यामध्ये ६० वर्षांवरील व्यक्तीला अटक न करणे, कमाल शिक्षेपैकी निम्म्या शिक्षेचा कालावधी कारागृहात काढला असेल तर संशयिताला जामीन देणे आदी तरतुदी नवीन कायद्यात करण्यात आल्या आहेत.

पूर्वी पती-पत्नींचा व्याभिचार हा गुन्हा होता. त्यासाठी ७ वर्षे शिक्षा होती. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे हाही गुन्हा होता. त्यासाठी २ वर्षे शिक्षा होती. सर्व गुन्ह्यांमध्ये वयाचा विचार न करता पोलिसांकडून अटक. होत होती. आता ६० वर्षावरील व्यक्तींना तीन वर्षांपर्यत शिक्षा असलेल्या गुन्ह्यात अटक करता येणार नाही. पूर्वी अनैसर्गिक शारीरिक संबंध गुन्हा ठरत होता. मात्र आता ते कलम काढून टाकण्यात आले आहे.

भारतीय दंड संहिता कायद्यात २३ प्रकरणे व५११ कलमे होती. आता नवीन भारतीय न्याय संहिता कायद्यात २० प्रकरणे व ३५८ कलमे आहेत. नवीन कायद्यात जुनी १२ कलमे वगळून नवीन १२ कलमांचा समावेश केला आहे. २९ कलमांमध्ये शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर २३ कलमांमध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. आणि ८३ कलमांमध्ये दंडाची रक्कम वाढवली आहे. पूर्वीच्या कायद्यामध्ये २२ कलमांमध्ये केवळ व्याख्या नमूद होती. आता कलम क्रमांक दोनमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे ३९ व्याख्यांची पोटकलमे नमूद आहेत. तीन नवीन कायद्यात फार बदल करण्यात आलेला नाही. काही अपवादात्मक कलमे वगळली अथवा वाढविली आहेत. जुन्या कायद्यांचा मूळ मतितार्थ व गाभा आहे तसाच ठेवला आहे.

केवळ कलमांचे क्रमांक मागे पुढे करण्यात आले आहेत. या नवीन कलमाची माहिती घेण्यासाठी वकील व पोलिसांना थोडा अवधी लागू शकतो. या नवीन कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे ७ वषपिक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये आवश्यक तरच संशयिताला पोलिसांनी अटक करायची आहे. सराईत गुन्हेगार, बलात्कार, अॅसिड अॅटॅक, संघटित गुन्ह्यातील संशयित, अमली पदार्थ गुन्ह्यामधील संशयित व राजद्रोहातील संशयित व्यतिरिक्त कोणत्याही संशयिताला पोलिस बेड्या घालू शकणार नाहीत. एखाद्या संशयिताला त्याच्या गुन्ह्याच्या कमाल शिक्षेच्या निम्मी शिक्षा त्याने न्यायालयीन कोठडीत काढली असेल तर त्याला जामिनावर सोडावे लागेल. याला अपवाद त्याची कमाल शिक्षा जन्मठेप असेल किंवा इतर गुन्ह्यामध्ये त्याला अद्याप जामीन झालेला नसेल तर त्याला हा नियम लागू होणार नाही.

नवीन कायद्याची नावे • (कंसात जुना कायदा)

भारतीय न्याय संहिता (भारतीय दंड संहिता किंवा इंडियन पिनल कोड),
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (क्रिमिनल प्रोसिजर कोड),
भारतीय साक्ष कायदा (इंडियन एव्हिडन्स् अॅक्ट).

ज्येष्ठांच्या अटकेसाठी परवानगीची गरज

ज्या गुन्ह्यामध्ये तीन वषर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा गुन्ह्याच्या बाबतीत संशयिताला अटक केली जाऊ शकत होती. आता ३ वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये ६० वर्षावरील संशयिताच्या अटकेसाठी पोलिस उपअधीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे.
हेही वाचा 

कोल्हापूर : सायबर गुन्हेगारी वाढली; पोलिस ठाण्यात मात्र ‘प्रभारी’
Nashik Teachers’ Constituency 2024 : ‘काय सफारी, काय नथ, काय पैठणी ओक्केमधी हाय सगळं’