महताब यांनी घेतली लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील कटक लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब यांनी सोमवारी (दि.२४) १८ व्या लोकसभेचे प्रभारी लोकसभा अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) म्हणून शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. महताब हे आजपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवतील. १८ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रापूर्वी (Parliament Session 2024) विरोधकांच्या तीव्र आक्षेपानंतरही भाजप …

महताब यांनी घेतली लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ओडिशातील कटक लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब यांनी सोमवारी (दि.२४) १८ व्या लोकसभेचे प्रभारी लोकसभा अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) म्हणून शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. महताब हे आजपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवतील.
१८ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रापूर्वी (Parliament Session 2024) विरोधकांच्या तीव्र आक्षेपानंतरही भाजप खासदार भर्तृहरी महताब यांनी सोमवारी लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. महताब यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता संसद भवनात लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. ते सर्वप्रथम लोकसभेचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ घेण्यासाठी बोलावतील.
महताब यांच्या निवडीवर विरोधकांकडून टीका झाली. विशेषत: काँग्रेसने त्यावर जोरदार आक्षेप घेतला. लोकसभेत आठवेळा खासदार म्हणून राहिलेले कोडीकुन्नील सुरेश यांची प्रभारी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्याची मागणी काँग्रेसने केली होती.
संसदेचे अधिवेशन आज सोमवारपासून सुरू झाले. १८ व्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात एनडीए सरकारची कसोटी लागणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत; तर या माध्यमातूनच आपली ताकद दाखवण्याचा एनडीएचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय अनेक विषयांवर विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांत खडाजंगी पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. हे अधिवेशन ३ जुलैपर्यंत चालेल.
कोण आहेत भर्तृहरी महताब?
भर्तृहरी महताब हे ओडिशातील कटक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ओडिशाच्या राजकारणातील ते प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. महताब यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्चमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते बिजू जनता दलामध्ये होते. २०१७ मध्ये त्यांना लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

#WATCH | Delhi: BJP MP Bhartruhari Mahtab takes oath as pro-tem Speaker of the 18th Lok Sabha
President Droupadi Murmu administers the oath pic.twitter.com/VGoL5PGEkT
— ANI (@ANI) June 24, 2024

हे ही वाचा :

लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष, कशी होते नियुक्ती, काय असते जबाबदारी
कुठे आहेत राहुल गांधी आणि खर्गे? तामिळनाडू विषारी दारु प्रकरणी निर्मला सीतारामण यांचा सवाल