आळंदीत उद्यापासून वाहनांना प्रवेश बंदी; पासधारक वारकर्यांच्या वाहनांनाच प्रवेश
आळंदी : Bharat Live News Media वृत्तसेवा : संत श्रीज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा शनिवारी (दि.29) होणार आहे. सोहळ्यासाठी मंगळवार (दि. 25)पासून शहरात दिंड्या व वारकरी दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने वारीकाळात वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली आहे. केवळ दिंड्याच्या पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे.
मंगळवार (दि.25) ते रविवार (दि.30)पर्यंत ही बंदी असणार आहे. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिस ठाण्याने केले आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून शिक्रापूर महामार्गमार्गे चाकण, वडगाव घेनंद, कोयाळी, मरकळ असा व नगर महामार्गमार्गे लोणीकंद फाटा, तुळापूर, मरकळ, आळंदी व चर्होली बुद्रुक फाटा ते चर्होली खुर्द अशा जोडरस्त्याचा वापर करता येणार आहे. पुण्यावरून येणार्या वाहनांना चर्होली फाटा-मोशीमार्गे-चाकण असा पर्यायी मार्ग असणार आहे. पालखी प्रस्थान शनिवारी झाल्यानंतर पालखी रविवारी (दि.30) सकाळी सहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.
हेही वाचा
चिमुकलीवर मोफत हृदयशस्त्रक्रिया यशस्वी
लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष, कशी होते नियुक्ती, काय असते जबाबदारी
उद्या कोल्हापूर बंद; आज मध्यरात्रीपासून रिक्षा, टॅक्सी बंद