Event Management : इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील नोकरीच्या संधी

इव्हेंट मॅनेजमेंट असं म्हटलं की, ‘यात काय शिकायचं,’ असं कदाचित कुणाला वाटू शकतं; परंतु खरोखरच या क्षेत्रात आता करिअर घडवता येतं आणि विचारपूर्वक पावलं टाकली तर अशा शिक्षणाच्या आधारावर हल्लीच्या काळात नोकरी-व्यवसायात बस्तानही बसवता येतं. इव्हेंट मॅनेजमेंट हे अभ्यास क्षेत्र म्हणून अलीकडच्या काळात बरंच विकसित झालंय. हा विषय शिकताना सामान्यत: पुढील घटकांचा समावेश केलेला दिसतो …

Event Management : इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील नोकरीच्या संधी

इव्हेंट मॅनेजमेंट असं म्हटलं की, ‘यात काय शिकायचं,’ असं कदाचित कुणाला वाटू शकतं; परंतु खरोखरच या क्षेत्रात आता करिअर घडवता येतं आणि विचारपूर्वक पावलं टाकली तर अशा शिक्षणाच्या आधारावर हल्लीच्या काळात नोकरी-व्यवसायात बस्तानही बसवता येतं. इव्हेंट मॅनेजमेंट हे अभ्यास क्षेत्र म्हणून अलीकडच्या काळात बरंच विकसित झालंय.
हा विषय शिकताना सामान्यत: पुढील घटकांचा समावेश केलेला दिसतो – इंग्रजी संवाद कौशल्य, व्यवस्थापकीय प्रक्रिया, व्यावसायिक संवाद कौशल्य, पर्यावरणाचा अभ्यास, वित्तीय व्यवस्थापन, मानवाधिकार, कार्यकारी अधिकार्‍यांसाठी आवश्यक अर्थशास्त्र, सेवा क्षेत्रासाठी जाहिरात व्यवस्थापन, संस्थात्मक वागणूक, विक्री व्यवस्थापन, जनसंपर्काची ओळख, नियोजनाची कौशल्य, इव्हेंट निर्मितीची प्रक्रिया, मनुष्यबळ व्यवस्थापन, इव्हेंटसाठी येणार्‍या खर्च व निधीची उपलब्धता, मार्केटिंग, प्रायोजकत्व, ब्रँडिंग, सॉफ्टवेअरची हाताळणी, इव्हेंटसाठी लागणार्‍या साधनसामग्रीचं व्यवस्थापन, विविध नियम, कायदे आणि परवानग्या, मीडिया व्यवस्थापन इत्यादी. हे क्षेत्र हल्ली अनेकांना खुणावतंय यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे नावीन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी करण्याची संधी या क्षेत्रात मिळत राहण्याची शक्यता मोठी असते. त्यामुळं सर्जनशीलता, वेगळा विचार करण्याचं कौशल्य, तंत्रावरची हुकूमत आणि परिश्रम करण्याची तयारी असणार्‍या व्यक्तींना या क्षेत्रात रोजगार आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.
दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमाचं प्रमोशन, विविध पुरस्कारांचे कार्यक्रम, संगीताचे किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, पुस्तक प्रकाशन, लिटरेचर फेस्टिव्हल, धार्मिक उत्सव, सेलिब्रिटींचे वाढदिवस, मोठे उद्योग किंवा कॉर्पोरेटस् यांच्या सभा, वार्षिक बैठका, लग्न सोहळे अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे अलीकडच्या काळात सोपवण्यात येताना दिसतं. अशा कंपन्यांकडे विविध प्रकारची कौशल्यं असलेली माणसं किंवा टीम कार्यरत असते. या टीममध्ये सहभागी होऊन आपलं शिक्षण, कौशल्य आणि सर्जनशीलता योग्य पद्धतीनं वापरली तर या क्षेत्रात पाय रोवून नक्की उभा राहता येऊ शकतं. त्यामुळं एक वेगळं अभ्यास व कार्यक्षेत्र निवडायचं असेल तर इव्हेंट मॅनेजमेंटचा विचार करणं हे हल्ली काळाशी सुसंगत मानलं जातं.
हेही वाचा 

पर्याय हॉटेल मॅनेजमेंटचा  | Bharat Live News Media
असे करा डेटा मॅनेजमेंट  | Bharat Live News Media
Career Opportunities : पवनऊर्जेतील करिअर संधी