चिमुकलीवर मोफत हृदयशस्त्रक्रिया यशस्वी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : वढू खुर्द येथील उपासना संतोष सोनावणे या 5 वर्षीय मुलीला हृदयविकाराचा आजार होता. तिची तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. लहान मुलीसह आई-वडिलांचे डोळे अधू तसेच घरची परिस्थिती हलाखीची असल्याने एवढा खर्च करणे शक्य नव्हते. अशा वेळी श्री सद्गुरू शंकर महाराज आरोग्य शिबिरामध्ये डॉ. दिनेश रंगरेज यांच्या प्रयत्नांनी मुलीची मोफत शस्त्रक्रिया पार पडली.
सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती व श्री सद्गुरू शंकर महाराज हेल्थ फाउंडेशनच्या मोफत रुग्णसेवा अभियानांतर्गत जहांगीर रुग्णालयात मुलीची शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिषकुमार बाणापूरकर यांनी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. राजाभाऊ रेवडे, प्रशांत सूर्यवंशी, जहांगीर रुग्णालयामधील डॉ. अशोक घोणे, डॉ. आशिष कुमार व सर्व कर्मचार्यांचे विशेष सहकार्य लाभले.
डॉ. दिनेश रंगरेज व त्यांच्या डॉक्टरांच्या टीममार्फत दर दुर्गाष्टमीला मोफत महाआरोग्य व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाते. धनकवडीतील श्री सद्गुरू शंकर महाराज मठाबाहेर होत असलेल्या शिबिरात गोरगरीब व गरजूंना मोफत औषधोपचार व आरोग्य तपासणी केली जाते. या अभियानांतर्गत आजवर अनेक गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रियांचा लाभ मिळाला आहे.
हेही वाचा
अडीच लाख मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा; आम आदमी पार्टीचे आंदोलन
जगातील सर्वात गरीब देश
‘जय भवानी, जय शिवराय’चा जयघोष; सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालखी मिरवणूक