वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरानजीक असलेल्या मौजे वडकी गावदरा परिसरात स्फोटासाठी वापरले जाणारे तब्बल 67 डिटोनेटर सापडले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली असून, संबंधित ठिकाणी बीडीडीएसच्या पथकांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याकडून याचा तपास करण्यात येत असून, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडकीतल्या गावदरा वस्तीत शुक्रवारी 67 डिटोनेटर सापडले आहेत. डोंगराच्या परिसरात कुणीतरी हे डिटोनेटर ठेवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
पोलिसांची कार्यतत्परता
सुदैवाने याबाबतची माहिती समोर आल्याने पोलिसांनी तत्काळ बॉम्बशोधक व नाशक पथकाला याची माहिती दिली. त्यानुसार या पथकाकडून आता ते मृत आहे की कसे, याबाबत तपासणी करण्यात येत आहे. लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा
Nashik Teachers’ Constituency 2024 : ‘काय सफारी, काय नथ, काय पैठणी ओक्केमधी हाय सगळं’
धोकादायक कृषी भवन पाडणार; नवीन कृषी आयुक्तालयाच्या इमारतीसाठी शासनाचा निर्णय
पाऊस खंडित स्वरूपातच; अतिवृष्टीचे इशारे का ठरत आहेत फोल?