जालना : मनोज जरांगे- पाटील यांना काळे झेंडे दाखविणारे ११ जण पोलिसांच्या ताब्यात
शहागड, पुढारी वृत्तसेवा : शहागडकडून अंबडमार्गे जालनाकडे जात असताना अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ आज (दि.१) दुपारी मनोज जरांगे- पाटील यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. अंबड पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले. हे सर्वजण राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक होते.
जरांगे- पाटील यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात हे ओबीसी समर्थक होते. त्यांची प्रमुख मागणी होती की आम्ही काळे झेंडे दाखवत नाहीत. परंतु, सकल मराठा समाजाच्या सभेला जात असताना अंबड शहरामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना अपशब्द वापरून शिवीगाळ केली. याच्या निषेधार्थ आम्ही काळे झेंडे दाखवणार होतो.
यावेळी अंबड पोलिसांनी आकाश राहटगावकर, सावंत कटारे, संतोष राऊत, सावंत लगड, धर्मराज बाबर, ईश्वर पिराने, नंदकिशोर कुंड, परमेश्वर भागवत, शिवप्रसाद गाजरे, मारुती घोगरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. काळे झेंडे न दाखवता निवेदन द्यावे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक आभुंरे यांनी त्यांना सांगितले.
हेही वाचा
जालना शहरात मनोज जरांगे- पाटील यांचे जल्लोषी स्वागत
Manoj Jarange Patil : जालन्यात ८० एकर क्षेत्रावर मनोज जरांगे-पाटीलांची आज सभा
तुम्ही मराठा समाजाला तोडले; जातीय तेढ निर्माण करू नका : मनोज जरांगे-पाटील
The post जालना : मनोज जरांगे- पाटील यांना काळे झेंडे दाखविणारे ११ जण पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.
शहागड, पुढारी वृत्तसेवा : शहागडकडून अंबडमार्गे जालनाकडे जात असताना अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ आज (दि.१) दुपारी मनोज जरांगे- पाटील यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. अंबड पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले. हे सर्वजण राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक होते. जरांगे- पाटील यांच्या ताफ्याला काळे झेंडे …
The post जालना : मनोज जरांगे- पाटील यांना काळे झेंडे दाखविणारे ११ जण पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.