सर्वात महागडे बिस्कीट!
लंडन : बिस्कीटे अगदी पाच रुपयांपासूनही मिळतात आणि त्यात 8-10 बिस्कीटे सहज असतात. काही बिस्कीटेे महागडी देखील असतात. पण, जगभरातील एक बिस्कीट इतके महागडे आहे की, त्या किमतीत अगदी आलिशान, नवी कोरी कारदेखील सहज विकत घेता येऊ शकेल.
आता जगातील हे सर्वात महागडे म्हणजे स्पिलर्स अँड बेकर्सचे पायलट क्रॅकर बिस्कीट. हे बिस्कीट जगातील सर्वात मौल्यवान बिस्कीट म्हणून ओळखले जाते आणि त्याचे खास कारण देखील आहे. बीबीसीच्या एका अहवालानुसार, या बिस्कीटाचा लिलाव करण्यात आला, त्यावेळी त्याची किंमत 15 हजार पाऊंड म्हणजेच 15 लाख रुपये आहे. ग्रीसच्या कलेक्टरने हे बिस्कीट त्यावेळी विकत घेतले होते.
आता हे बिस्कीट इतके महागडे का, असा प्रश्न निर्माण होईल. याचे कारण असे की, हे एकमेव बिस्कीट टायटॅनिकवरील होते. टायटॅनिकच्या एका लाईफ बोटमध्ये ठेवलेल्या सर्व्हायव्हल किटमध्ये ते सुरक्षित सापडले आणि त्यानंतर त्याचा लिलाव केला गेला.
टायटॅनिकमधून बचावलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या आरएमएस कार्पाथिया जहाजातील जेम्स आणि मेबेल फेनविक या कपलने हे बिस्कीट उचलले. ते त्यांनी कोडॅक फिल्मच्या पाकिटात आठवण म्हणून जपून ठेवले. या बिस्कीटाचा लिलाव करणारे लिलावदार अँर्ड्यू एल्ड्रिज यांनी याआधीही महागडे बिस्कीट विकले होते. एवढ्या भीषण अपघातातून एक बिस्कीट सुरक्षित राहिले. त्यामुळे त्याला महागडी बोली लागणार, हे साहजिकच होते.