धोकादायक कृषी भवन पाडणार; नवीन कृषी आयुक्तालयाच्या इमारतीसाठी शासनाचा निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या नवीन कृषी आयुक्तालयाच्या ‘कृषी संकुल’ या इमारतीचे काम प्रगतिपथावर असून, या प्रकल्पाची किंमत सुमारे 248 कोटी रुपये आहे. सध्या बांधकाम सुरू असलेल्या पूर्वीच्या फलोत्पादन संचालनालयासमोरील सुमारे 52 वर्षांच्या धोकादायक झालेल्या शिवाजीनगरमधील कृषी भवन ही इमारत पाडण्यात येणार आहे. त्यामधील सध्याची कार्यालये दोन वर्षांच्या कालावधीसाठी म्हात्रे पुलाजवळील डीटीसी सेंटर येथील …

धोकादायक कृषी भवन पाडणार; नवीन कृषी आयुक्तालयाच्या इमारतीसाठी शासनाचा निर्णय

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याच्या नवीन कृषी आयुक्तालयाच्या ‘कृषी संकुल’ या इमारतीचे काम प्रगतिपथावर असून, या प्रकल्पाची किंमत सुमारे 248 कोटी रुपये आहे. सध्या बांधकाम सुरू असलेल्या पूर्वीच्या फलोत्पादन संचालनालयासमोरील सुमारे 52 वर्षांच्या धोकादायक झालेल्या शिवाजीनगरमधील कृषी भवन ही इमारत पाडण्यात येणार आहे. त्यामधील सध्याची कार्यालये दोन वर्षांच्या कालावधीसाठी म्हात्रे पुलाजवळील डीटीसी सेंटर येथील जागा भाड्याने घेऊन हलविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार स्थलांतरित जागेत कृषी कार्यालये सुरू झाल्याची माहिती आयुक्तालयातून देण्यात आली.
राज्य सरकारने शिवाजीनगर येथील कृषी आयुक्तालयाचे कृषी संकुल उभारण्याच्या बांधकामाला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गती दिली आहे. नव्या कृषी- संकुल इमारतीचे क्षेत्रफळ सुमारे 55 हजार 600 चौरस मीटर तथा पाच लाख 60 हजार चौरस फुटाइतके आहे. दरम्यान, शिवाजीनगरमधील सध्याच्या कृषी भवन या इमारतीचे बांधकाम 1972 मध्ये पूर्ण झालेले आहे.
इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट हे पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत 2016-2017 मध्ये करण्यात आलेले आहे. त्यांच्या अहवालानुसार ही इमारत धोकादायक झालेली आहे. शिवाय वापरण्यास असुरक्षित असल्याबाबतचा अहवाल कृषी विभागाला पूर्वीच देण्यात आलेला होता. कृषी भवन इमारतीतील कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी जाहीर प्रसिद्धी देऊन जागांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार किमान दर आलेल्या एरंडवणा येथील डीटीसी सेंटर येथे कार्यालये स्थलांतरणास शासनाने मान्यता दिल्याचे आयुक्तालयातून सांगण्यात आले.
स्थलांतरित जागेत सुरू झालेली कार्यालये
एरंडवणामध्ये स्थलांतरित केलेल्या जागेत पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासह पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचाही समावेश आहे. याशिवाय उपविभागीय कृषी अधिकारी पुणे कार्यालय, हवेली तालुका कृषी अधिकारी, किडनाशके उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा, आदर्शगाव कार्यालय, प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय यांचा समावेश आहे.
तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरील संचालक आत्मा, स्मार्ट प्रकल्प नोडल अधिकारी, कृषी गणना उपायुक्त, दक्षता पथकाचे अधीक्षक कृषी अधिकारी, सहाय्यक संचालक लेखा, मृद सर्वेक्षण व मृद चाचणी- नैसर्गिक कक्ष ही कार्यालये डीटीसी सेंटर, सहावा मजला, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे पुणे येथे स्थलांतरित झाल्याचे पत्र पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांनी जारी केले आहे.
दरमहा 38 लाख भाडे मंजूर
कृषी भवन इमारत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, हवेली तालुका कृषी अधिकारी ही सर्व कार्यालये मिळून एकूण मंजूर पदांची संख्या 471 आहे. डीटीसी सेंटर येथे एकाच ठिकाणी 36 हजार चौरस फूट जागा उपलब्ध झाली आहे. कृषी विभागाने ही जागा सद्य:स्थितीत दोन वर्षासाठी भाड्याने घेतलेली आहे. त्यासाठी दरमहा जीएसटी करासह 38 लाख 16 हजार रुपये भाडे रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे.

हेही वाचा

आकाशात 80 वर्षांनतर होणार तारकीय स्फोट
सातारा : तब्बल २७ वर्षांनंतर मिळाला हक्काचा निवारा
Stock Market | अर्थवार्ता- ‘या’ कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक तेजीत