अतिवृष्टीचे इशारे का ठरत आहेत फोल?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हवामान विभागाने गेल्या तीन दिवसांपासून कोकणात दिलेले अतिवृष्टीचे इशारे फोल ठरले आहेत. रविवारी मान्सूनने न बरसताच अवघे राज्य व्यापल्याची घोषणा हवामान विभागाने केली. अतिवृष्टीचे इशारे देऊनही मान्सून खंडित स्वरूपातच पडत आहे. हवामान विभागाने २० जूनपासून राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे जाहीर केले होते. यात कोकणात अतिवृष्टी, तर उर्वरित राज्यात मुसळधार पाऊस …

अतिवृष्टीचे इशारे का ठरत आहेत फोल?

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : हवामान विभागाने गेल्या तीन दिवसांपासून कोकणात दिलेले अतिवृष्टीचे इशारे फोल ठरले आहेत. रविवारी मान्सूनने न बरसताच अवघे राज्य व्यापल्याची घोषणा हवामान विभागाने केली. अतिवृष्टीचे इशारे देऊनही मान्सून खंडित स्वरूपातच पडत आहे.
हवामान विभागाने २० जूनपासून राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे जाहीर केले होते. यात कोकणात अतिवृष्टी, तर उर्वरित राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज दिला होता. मात्र तीन दिवस उलटून गेले, तरी त्या अंदाजानुसार मान्सून पडलाच नाही. उलट मान्सून खंडित स्वरूपातच अजूनही पडत आहे. रविवारी राज्यातील बहुतांश भागांत कडक ऊन होते. उन्हामुळे पुन्हा घराघरांत पंखे, कुलर अन् एअर कंडिशनर सुरू झाले होते. अस्वस्थ करणाऱ्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते.
रविवारी मान्सून अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत गेला. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पुढे गेला आहे. महाराष्ट्र-केरळ किनाऱ्यापासून समुद्रसपाटीपर्यंत एक कुंड तयार झाले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात वादळी वारे ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वाहत आहे. मात्र कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात खंडित स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.
का ठरत आहेत इशारे फोल ?
शनिवारी कोकणाला रेड, तर रविवार ते सोमवार ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तेवढा पाऊसच पडला नाही. उर्वरित राज्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. काही हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा जूनमधील पाऊस हा खंडित स्वरूपाचा असून, हवेचा दाब असमान असल्याने तो कमी-जास्त प्रमाणात पडत आहे.
हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते. समुद्र आणि महासागरावर जर हवेचा दाब १००७ ते १००८ हेक्टापास्कल इतका असेल, तर बाष्पयुक्त वाऱ्याचे वहन होण्यासाठी तो दाब १००३ ते १००४ इतका व्हावा लागतो. तेव्हाच बाष्प कमी दाबाच्या क्षेत्राकडे येतील. पण यंदा जूनअखेरपर्यंत खंडित पावसाचीच शक्यता दिसत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस जोर धरेल असे वाटते. कारण तोवर दाब कमी होईल असा अंदाज आहे.
– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ