अर्थवार्ता- ‘या’ कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक तेजीत

* गत सप्ताहात शुक्रवारच्या सत्रात निफ्टी व सेन्सेक्स अनुक्रमे एकूण 65.90 अंक आणि 269.03 अंक घटून 23501.1 आणि 77209.9 अंकांच्या पातळीवर बंद झाले. दिवसभरात निफ्टीमध्ये 0.28 टक्के व सेन्सेक्समध्ये 0.35 टक्क्यांची घट नोंदवली गेली. एकूण सप्ताहाचा विचार करता निफ्टीने 35.50 अंक (0.15 टक्के) तर सेन्सेक्सने 217.1380.28 टक्के अंकांची वाढ नोंदवली. सर्वाधिक वाढ होणार्‍या कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय …
अर्थवार्ता- ‘या’ कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक तेजीत

* गत सप्ताहात शुक्रवारच्या सत्रात निफ्टी व सेन्सेक्स अनुक्रमे एकूण 65.90 अंक आणि 269.03 अंक घटून 23501.1 आणि 77209.9 अंकांच्या पातळीवर बंद झाले. दिवसभरात निफ्टीमध्ये 0.28 टक्के व सेन्सेक्समध्ये 0.35 टक्क्यांची घट नोंदवली गेली. एकूण सप्ताहाचा विचार करता निफ्टीने 35.50 अंक (0.15 टक्के) तर सेन्सेक्सने 217.1380.28 टक्के अंकांची वाढ नोंदवली. सर्वाधिक वाढ होणार्‍या कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक (4.8 टक्के), अ‍ॅक्सिस बँक (4.8 टक्के), एचडीएफसी बँक (4.3 टक्के), अदानी पोटर्स (3.8 टक्के), कोटक महिंद्रा बँक (3.4 टक्के) या समभागांचा समावेश झाला. तसेच सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये हिरोमोटोकॉर्प (-6.1 टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (-5.2 टक्के), एल अँड टी (-4.1 टक्के), टायटन कंपनी (-3.7 टक्के), बजाज ऑटो (-3.6 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. सप्ताहादरम्यान सेन्सेक्सने आजपर्यंतच्या सर्वोच्च विक्रमी पातळीला म्हणजेच 77851.63 अंकांना स्पर्श केला. तसेच निफ्टीनेदेखील 23667.1 अंकांची सर्वोच्च विक्रमी पातळी गाठली होती; परंतु सप्ताहाअखेर गुंतवणूकदारांनी नफा नोंदवण्यास (प्रॉफिट बुकिंग) प्रारंभ केल्याने दोन्ही निर्देशांक खाली आले.
* ब्रिटिश दूरसंचार कंपनीने टॉवर्सची सेवा पुरवणारी आपली उपकंपनी इंडस टॉवर्समधला 18 टक्के हिस्सा 15300 कोटींना विकला. सध्या भारताताल व्होडाफोन आयडीया कंपनीवर थकीत करांचे ओझे आहे तसेच ब्रिटनमधल्या व्होडाफोन ग्रुप पीएलसी या प्रमुख कंपनीवरदेखील 1.8 अब्ज युरोचे कर्ज आहे. या कंपनीची कर्जे फेडण्यासाठी या रकमेचा वापर केला जाणार असल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.
* 28 जूनपासून जेपी मॉर्गनच्या रोखे निर्देशांकात भारतीय रोख्यांचा समावेश होणार. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये या बातमीची घोषणा झाल्यापासून तब्बल 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आतापर्यंत भारतीय रोख्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांकडून करण्यात आली.
* कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करणारी एनव्हिडिया ही अमेरिकेची कंपनी जगातील सर्वात मोठी भांडवल बाजारमूल्य असणारी कंपनी ठरली आहे. ऑक्टोबर 2022 नंतरच्या नीचांकी पातळीपासून एनव्हिडियाचे बाजारमूल्य तब्बल 1100 टक्के म्हणजेच 11 पटींनी वाढले आहे. 2024 सालात या कंपनीच्या समभागाने तब्बल 173 टक्क्यांचा परतावा दिला. मंगळवारच्या एका सत्रात एनव्हिडियाच्या बाजारभांडवलात 103 अब्ज डॉलर्सची भर पडली. कंपनी 1 ट्रिलियन डॉलर्सवरून 2 ट्रिलियन डॉलर्सवर जायला केवळ नऊ महिने लागले, तर मागील तीन महिन्यात कंपनीने 3 ट्रिलियन डॉलर्स बाजार मूल्याचा (Market Cop) टप्पादेखील पार केला. यामुळे अ‍ॅपल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या बलाढ्य कंपन्यांना मागे सारून एनव्हिडियाने केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगात सर्वात मोठी कंपनी असण्याचा मान पटकावला.
* इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी ओला इलेक्ट्रिक लवकरच आयपीओद्वारे भांडवलबाजारात उतरणार. यासाठी बाजारनियामक संस्था सेबीकडून मान्यता मिळाली. एकूण 5500 कोटी रुपयांचा हा आयपीओ असणार आहे आणि ओला इलेक्ट्रिकचे सध्याचे प्रवर्तक आणि गुंतवणूकदार यांचे ओएफएस (ऑफर फॉर सेल) द्वारे 95.2 दशलक्ष समभाग असणार आहेत. डिसेंबर 2023 मध्ये ओला इलेक्ट्रिकने आयपीओसाठी अर्ज केला होता. 5500 कोटींपैकी 1600 कोटी रुपये हे रिसर्च अँड डेव्हल्पमेंटसाठी, तर 1226.43 कोटी रुपये हे प्रकल्प विस्तारासठी वापरले जाणार.
* 17 जूनअखेर प्रत्यक्ष करसंकलन (Direct Taxes) 21 टक्क्यांनी वाढून 4.62 लाख कोटींवर पोहोचले. यामध्ये व्यावसायिक कराचे प्रमाण (Corporat Tax) चे प्रमाण 1.80 लाख कोटी तर वैयक्तिक उत्पन्न करांचे प्रमाण (Perzonal income) 2 लाख 81 हजार कोटी आहे. 15 रोजीपर्यंत जमा होणार्‍या अग्रीम करांच्या हप्त्यामुळे (Advance Tax Collection) करसंकलन वाढल्याची माहिती मिळत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सरकारने 10 लाख 40 हजार कोटी व्यावसायिक करांद्वारे, तर 11.56 लाख कोटी वैयक्तिक उत्पन्न करांद्वारे जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
* महाराष्ट्रातील वाढवण बंदर उभारणीसाठी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने 76200 कोटींच्या निधीची घोषणा केली. मंत्रिमंडळ बैठकीत या बंदराचा विकास करण्याचा प्रस्ताव संमत झाला. या बंदराच्या उभारणीपश्चात जगातील सर्वात मोठ्या 10 सागरी बंदरांमध्ये याचा समावेश होईल. या बंदराची 298 दशलक्ष टन सामान दरवर्षी हाताळण्याची क्षमता असेल. सध्या देशातील सर्व बंदरामध्ये मिळून जेवढी क्षमता आहे, त्यापेक्षा अधिक क्षमता या अवाढव्य सागरी बंदराची असेल. यामुळे पश्चिम किनारपट्टीवरून युरोप आणि मध्यपूर्वेतील देशांशी होणार्‍या सागरी व्यापारास उत्तेजन मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.
* जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत हाँगकाँगने अव्वल स्थान पटकावले. मुंबईने 136 चे, दिल्लीने 164 तर पुण्याने 205 वे स्थान मिळवले. केवळ आशियाचा विचार करता, मुंबईने आशियातील 21 वे महागडे शहर म्हणून स्थान मिळवले. मर्सर या संस्थेच्या Costliest City to Live या अहवालात ही माहिती देण्यात आली.
* झोमॅटो ही खाद्यान्न घरपोच पोहोचवणारी (Food Delivery) कंपनी लवकरच पेटीएमचा सिनेमा तिकीट विक्रीचा व्यवसाय खरेदी करण्याची शक्यता. एकूण 1500 ते 2000 कोटींमध्ये हा व्यवहार होण्याची शक्यता.
* भारतीय नागरिक आणि कंपन्यांनी स्वीस बँकांमध्ये ठेवलेला पैसा मागील चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर. भारतीय लोकांचा स्वीस बँकांमध्ये एकत्रितपणे मिळून 1.04 अब्ज स्वीस फ्रँक म्हणजे सुमारे 9771 कोटी रुपये इतका पैसा आहे. 2023 मध्ये या जमा पैशांमध्ये 70 टक्क्यांची घट नोंदवली. 2006 साली भारतीयांचा स्वीस बँकांमध्ये सर्वाधिक म्हणजे सध्याच्या सुमारे साडेसहापट 86.5 अब्ज स्वीस फ्रँक इतका पैसा होता.
* 14 जून रोजी संपलेल्या सप्ताहातून भारताची विदेश चलन गंगाजळी 2.92 अब्ज डॉलर्सनी घटून 652.9 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. 7 जून रोजी गंगाजळी आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच 6.55.8 अब्ज डॉलर्सपर्यंत गेली होती.