कॅरोलिनात आढळला गुलाबी डॉल्फिन!

नॉर्थ कॅरोलिना : समुद्रसृष्टीचे मनुष्याला अनंत काळापासून आकर्षण राहत आले आहे. समुद्रात आताही यापूर्वी कधीच पाहण्यात न आलेले जीव पाहण्यात येतात आणि यामुळे आश्चर्याचा आणखी एक धक्का बसतो. समुद्रातील डॉल्फिन सफारी तर अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे. फक्त डॉल्फिन पाहण्यासाठीच अनेकजण समुद्राची सफर करतात. प्रत्यक्षात आपण आजवर पाहत आलो आहोत ते सफेद डॉल्फिन असतात. मात्र, सध्या …

कॅरोलिनात आढळला गुलाबी डॉल्फिन!

नॉर्थ कॅरोलिना : समुद्रसृष्टीचे मनुष्याला अनंत काळापासून आकर्षण राहत आले आहे. समुद्रात आताही यापूर्वी कधीच पाहण्यात न आलेले जीव पाहण्यात येतात आणि यामुळे आश्चर्याचा आणखी एक धक्का बसतो. समुद्रातील डॉल्फिन सफारी तर अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे. फक्त डॉल्फिन पाहण्यासाठीच अनेकजण समुद्राची सफर करतात. प्रत्यक्षात आपण आजवर पाहत आलो आहोत ते सफेद डॉल्फिन असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर गुलाबी डॉल्फिनची काही छायाचित्रे व्हायरल होत असून, यामुळे गुलाबी डॉल्फिनची चर्चा रंगत आहे.
व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये दुर्मीळ गुलाबी डॉल्फिन समुद्रात पोहताना दिसत आहे. डॉल्फिन हा मानवानंतर जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. डॉल्फिन जितका हुशार आहे तितकाच दुर्मीळदेखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा गुलाबी डॉल्फिन अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना किनार्‍याजवळ दिसला होता. गुलाबी डॉल्फिन हा क्वचितच दिसणार्‍या प्राण्यांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत त्याचे दुर्मीळ रूप कॅमेर्‍यात कैद होणे ही प्राणीप्रेमींसाठी सुखद अनुभूती असते.
याआधीही कॅलिफोर्नियामध्ये व्हेल मासे पाहण्यासाठी गेलेल्या एका गटाला एक अद्भुत पांढरा डॉल्फिन दिसला होता. कॅस्पर नावाचा हा पांढरा डॉल्फिन व्हेल पाहण्यासाठी गेलेल्या लोकांच्या बोटीबरोबर पोहत होता. आतापर्यंत दुर्मीळ डॉल्फिनचे हे छायाचित्र असंख्य नेटिझन्सनी पाहिले असून, त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. गुलाबी डॉल्फिन पाहणे खरोखरच आश्चर्यकारक असल्याचे एका युजरने म्हटले, तर छायाचित्रात गडबड केली गेल्याचा ठपका एकाने ठेवला आहे.