राशिभविष्य : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मेष : तुमच्या कामाचे कौतुक होईल आजचा दिवस आव्हानात्मक असेल;पण आपण योग्यता आणि कठोर परिश्रमाद्वारे प्रत्येक परिस्थितीला तोंड …

राशिभविष्य : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : तुमच्या कामाचे कौतुक होईल
आजचा दिवस आव्हानात्मक असेल;पण आपण योग्यता आणि कठोर परिश्रमाद्वारे प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबातील सदस्‍यांशी भविष्यातील योजनांबाबत चर्चा होऊ शकते, असे श्रीगणेश म्‍हणतात. आर्थिक बाबतीत एखाद्याशी सौम्य मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील कामाची गती कमी होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. प्रकृतीमध्‍ये चढउतार उतार जाणवतील.
वृषभ : खर्चावर नियंत्रण ठेवा
आजचा दिवस अनुकूल राहील, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या विशेष कौशल्यांचे कौतूक होईल. नातेवाईकांशी संवाद साधाल. विद्यार्थी संघटना आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. आर्थिक अडचणीचा सामना करावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्‍यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रकृतीच्‍या तक्रारी असतील.
मिथुन : भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक व्हा
आजच दिवसभर व्यस्त दिनक्रम असेल. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक होऊन कामे पूर्ण करा. उधार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी योग्य वेळ आहे. नकारात्मक गोष्टींपासून लांब राहा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यावसायिक क्रियाकलापांचा गांभीर्याने विचार करा. जोडीदारासह कुटुंबातील सदस्‍याचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहिल.
कर्क : घरातील समस्या शांततेने सोडवा
आज तुम्‍हाला दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील. आनंदवार्ता मिळाल्‍याने घरातील वातावरण प्रसन्‍न राहिल, असे श्रीगणेश सांगतात. नवीन माहिती मिळवण्यात वेळ जाईल. घरातील कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचारांमुळे नैराश्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते.
सिंह: कोणताही निर्णय घेताना मन स्थिर ठेवा
श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या मेहनतीने परिस्थिती अनुकूल बनवाल. मेहनतीचे योग्य फळही तुम्हाला मिळू शकते. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये घाई करू नका. धार्मिक कार्यात सहभागी व्‍हाल. जवळच्या नातेवाईकांसोबत वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद वाढू शकतो. विचलित मनावर नियंत्रण ठेवा. कोणताही निर्णय घेताना मन स्थिर ठेवा. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः अनुकूल
महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः अनुकूल असेल. प्रतिभेच्या जोरावर विशेष ध्येय साध्य करू शकाल. मालमत्तेशी संबंधित विषयावर सकारात्‍मक चर्चा होईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनिक होऊन घेऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. वैवाहिक संबंध मधुर राहतील.
तूळ : मनाविरोधातील घटना घडल्‍याने चिडचिडेपणा हाेईल
श्रीगणेश सांगतात की, आज शिस्तबद्ध दृष्टिकोनातून अनेक गोष्टी व्यवस्थितपणे करू शकाल. राजकीय संबंध दृढ होतील. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास मोठा दिलासा मिळेल. मनाविरोधातील घटना घडल्‍याने स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. घरातील वातावरण प्रसन्न राहिल.
वृश्चिक : जुनी मैत्री प्रेमाच्या नात्यात बदलू शकते
आजचा दिवसाचा बराचसा वेळ आध्यात्मिक कार्यात जाईल, असे श्रीगणेश सांगतात. मानसिक शांतीही मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राखण्यात तुमची विशेष भूमिका असेल. कोणत्याही विशेष विषयावर चर्चा होईल. मुलांवर जास्त नियंत्रण ठेवू नका. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागण्याने त्यांचे मनोबल वाढेल. जुनी मैत्री प्रेमाच्या नात्यात बदलू शकते.
धनु: अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल
श्रीगणेश म्‍हणतात की, कुटुंबातील सदस्याच्या लग्नाबाबतही चर्चा होऊ शकते. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. काहीवेळा तुमचा अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त राहिल्यामुळे व्यवसायाशी संबंधित बहुतेक कामे घरबसल्या पूर्ण करता येतील. आरोग्य उत्तम राहील.
मकर : आवडीच्या कामात वेळ व्‍यतित कराल
आज तुमचा बराचसा वेळ तुमच्या वैयक्तिक आणि आवडीच्या कामात व्‍यतित कराल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत संतुलन कायम ठेवाल, असे श्रीगणेश सांगतात. नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींशी संबंधित कोणतीही अप्रिय घटना कमी झाल्यामुळे मनात निराशा राहील. खोकला, तापाच्‍या त्रास जाणवेल.
कुंभ: व्यवसायात आर्थिक बाबींचा अधिक विचार करावा
श्रीगणेश म्हणतात की, आज कोणत्याही सामाजिक सेवा संस्थेबद्दल सहकार्याची भावना दृढ होईल. तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळेल. कोणीतरी जवळचा नातेवाईक किंवा मित्र तुमची प्रतिमा खराब होण्‍याचा प्रयत्न करू शकतो. व्यवसायात आर्थिक बाबींचा अधिक विचार करावा लागेल.
मीन : गैरसमजामुळे मनात शंका, निराशेची स्थिती राहील
जवळच्या नातेवाईकाशी एखाद्या विशेष विषयावर गंभीर चर्चा होईल, त्‍याचे सकारात्‍मक परिणाम होतील, असे श्रीगणेश सांगतात. घरातील बांधकामाशी संबंधित प्रलंबित कामांबाबत निर्णय घ्‍याल. गैरसमजामुळे मनात शंका किंवा निराशेची स्थिती राहील. कार्यक्षेत्रात समज आणि दूरदृष्टीने काम करण्याची गरज आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.