पुणे : धबधब्याच्या तीव्र प्रवाहापलीकडे अडकलेल्या १४ जणांची सुटका

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : माळशेज घाटात झालेल्या तुफान पावसाने धबधब्याखालील प्रवाहाला पूर आल्याने वर्षाविहारासाठी आलेले १४ पर्यटक दुसऱ्या बाजूला अडकून पडले. नगर-कल्याण महामार्गावर गस्त घालत असलेल्या महामार्ग पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व पर्यटकांना प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला सुरक्षितपणे आणले. ही घटना रविवारी (दि. २३) दुपारी २ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. …

पुणे : धबधब्याच्या तीव्र प्रवाहापलीकडे अडकलेल्या १४ जणांची सुटका

ओतूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : माळशेज घाटात झालेल्या तुफान पावसाने धबधब्याखालील प्रवाहाला पूर आल्याने वर्षाविहारासाठी आलेले १४ पर्यटक दुसऱ्या बाजूला अडकून पडले. नगर-कल्याण महामार्गावर गस्त घालत असलेल्या महामार्ग पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व पर्यटकांना प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला सुरक्षितपणे आणले. ही घटना रविवारी (दि. २३) दुपारी २ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
माळशेज घाटात रविवारी सकाळपासूनच धुवाधार पाऊस बरसत आहे. दुपारी मुंबई व पुण्यातील महिला, पुरुष, एक वर्षाचा मुलगा आणि अन्य दोन मुले, असे एकूण १४ जण घाटातील एका धबधब्याजवळ भिजण्यासाठी गेले. मात्र, अचानक पावसाचा जोर वाढल्याने धबधब्याच्या प्रवाहातही मोठी वाढ झाली. त्यामुळे हे सर्वजण प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला अडकून पडले. कोणालाच प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सुरक्षितस्थळी येता येईना. दरम्यान, महामार्ग पोलिस घाटात गस्तीवर होते. त्यांना ही बाब समजताच त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले आणि सर्व पर्यटकांना प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
पावसाचा जोर अद्याप कायम असून, पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. या घटनेत कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नसल्याचे महामार्ग सहायक पोलिस निरीक्षक अनिल विसपुते यांनी सांगितले. विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी गणेश भोई, प्रशांत जाधव, कैलास कोकाटे, संजय घुडे आदींनी बचावकार्यात सहभाग घेतला. या कामगिरीबद्दल महामार्ग पोलिसांचे कौतुक होत आहे.