मी महात्मा गांधीच्या विचारांचा फॉलोअर : आमिर खान

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : अभिनेता अमिर खानने सेवाग्राम येथील आश्रमाला रविवारी (दि.23) भेट दिली. वर्ध्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त आमिर खान वर्ध्यात आले होते. यावेळी अमिर खान यांनी सेवाग्राम येथील आश्रम परिसरात भेट देत माहिती जाणून घेतली. यावेळी बोलताना खान म्हणाले, सेवाग्राम आश्रमात प्रथमच आलो आहे. येथे प्रवेश करताच वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली. मी …

मी महात्मा गांधीच्या विचारांचा फॉलोअर : आमिर खान

वर्धा, Bharat Live News Media वृत्तसेवा : अभिनेता अमिर खानने सेवाग्राम येथील आश्रमाला रविवारी (दि.23) भेट दिली. वर्ध्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त आमिर खान वर्ध्यात आले होते. यावेळी अमिर खान यांनी सेवाग्राम येथील आश्रम परिसरात भेट देत माहिती जाणून घेतली.
यावेळी बोलताना खान म्हणाले, सेवाग्राम आश्रमात प्रथमच आलो आहे. येथे प्रवेश करताच वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली. मी गांधीजींचा फॉलोअर आहे. बापूंच्या विचारांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. मला मोठा आनंद होत आहे की, जिथे बापूजी दीर्घ काळ राहिलेत, तेथे वेगळीच अनुभूती मला आली. ते मी शब्दात सांगू शकत नाही. येथे येऊन मला मोठा आनंद झाला आहे, असे अभिनेता आमिर खान म्हणाले.
यावेळी आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सूतमाळेने स्वागत करत आमिर खान यांना चरखा भेट देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नुरूल हसन, सह्यादी अ‍ॅग्रो फार्मिंगचे विलास शिंदे, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, भूषण कडू आदी यावेळी उपस्थित होते. आमिर खान यांच्या दौर्‍याच्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा :

Rahul Deshpande Controversy : अमिर खानच्या ‘लाल सिंग चढ्ढा’चे कौतुक राहुल देशपांडेला भोवले
चंद्रपूर : जादूटोणा विरोधी कायद्याची अंबलबजावणी करा; ‘अनिस’ची मागणी
पुणे- सोलापूर महामार्गावर बस झाडावर आदळली; वारकऱ्यांसह ३० प्रवासी जखमी