ठाण्यामध्ये बारा सापांना मिळाले जीवनदान

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : ठाण्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे नदी-नाल्यांसह लगतच्या शेती आणि जगंलातील विषारी-बिन विषारी सापांनी मानवी वस्तीकडे धाव घेतली आहे. बिळांमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे सापांनी मानवी वस्तीमध्ये शिरकाव केला आहे. या दरम्यान मागील तीन विषारी कोब्र्यासह सर्पमित्रांनी 10 ते 12 विषारी ते बिन विषारी सापांना मानवी वस्तीतून पकडून त्यांना …

ठाण्यामध्ये बारा सापांना मिळाले जीवनदान

डोंबिवली, Bharat Live News Media वृत्तसेवा : ठाण्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे नदी-नाल्यांसह लगतच्या शेती आणि जगंलातील विषारी-बिन विषारी सापांनी मानवी वस्तीकडे धाव घेतली आहे. बिळांमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे सापांनी मानवी वस्तीमध्ये शिरकाव केला आहे. या दरम्यान मागील तीन विषारी कोब्र्यासह सर्पमित्रांनी 10 ते 12 विषारी ते बिन विषारी सापांना मानवी वस्तीतून पकडून त्यांना जंगलात सोडून जीवदान दिले आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील शेकडो सापांना मानवी वस्तीतून पकडून त्यांना निर्सगामध्ये सोडून त्यांना जीवनदान दिले आहे. मागील तीन दिवसांत कल्याण पश्चिमेकडील विविध मानवी वस्तीमध्ये विषारी आणि बिन-विषारी साप शिरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
यामध्ये उंबर्डे येथील रहिवासी पाटील यांच्या पाळीव बदकाच्या पिंजऱ्यात साप घुसून त्याने बदकाची पिल्ले भक्ष्य केली होती. तर दोन हरणटोळ जातीचे सापही या गावातून मानवी वस्तीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच एक विषारी कोब्रा नाग मोनो कंपनीतून सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पकडला. त्यासोबत वाडेघर गावातून घोणस जातीचा साप, तर रौनक सिटी भागातून दिवड जातीचे 2 भलेमोठे साप पकडले. मात्र सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी या नागाला शिताफीने पकडून नेल्याने कुटुंबाने सुटकेचा निःश्वास टाकला.
साप दिसल्यास घाबरू नका
मानवी वस्तीतून पकडलेल्या 12 सापांना कल्याणच्या वन विभागाला माहिती देवून जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली. सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने मानवी वस्तीत साप आढळून आल्यास घाबरून जाऊ नका. तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.
हेही वाचा :

अकोला : अत्यंत दुर्मिळ ‘अंडी खाऊ साप’ खरप बु गावात आढळला
मोठी बातमी : सुकमामध्‍ये IED स्फोटात ‘सीआरपीएफ’चे दोन जवान शहीद
पांढर्‍या शिधापत्रिकाधारकांना 5 लाखांचे आरोग्य कवच