अकोला : पूर आला धावून, रस्ता गेला वाहून !
अकोला , Bharat Live News Media वृत्तसेवा : अकोल्यामध्ये मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे ओढ्यांना आणि नद्यांना पूर आला आहे. यामध्ये पठार नदीला आलेल्या पूरामध्ये दोन गावांना जोडणारा रस्ता वाहून गेल्याची घटना रविवारी (दि.23) समोर आली आहे.
अकोला येथील दनोरी आणि पनोरी या दोन गावामध्ये जाण्यासाठी पठार नदीवर अरुंद पुल बांधण्याचे काम सुरु आहे. हे पुलाचे काम मागील सहा महिन्यांपासुन सुरु आहे. त्यामुळे गावामध्ये ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता करण्यात आला होता. हा रस्ता रविवारी सकाळी पठार नदीच्या पूरात वाहून गेला आहे .
दनोरी-पनोरी या गावांना जोडण्यासाठी पठार नदीवर पुलाचे काम मागील 4 महिन्यापासून संथ गतीने काम सुरू आहे. पुलालगत बांधलेला कच्चा पर्यायी रस्ता मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पुर येऊन वाहून गेला. यामुळे या दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभागावर रोष व्यक्त करत आहेत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुलाचे बांधकाम होणे नागरिकांचा अपेक्षित होते. मात्र, पुल वाहून गेल्याने नदीच्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे.
हेही वाचा :
कमी पावसाला हवेचा दाबच जबाबदार; अल निनो, ला निना तटस्थ असताना अनेक वेळा पडला आहे पाऊस
कोल्हापूर : विशाळगड परिसरात जोरदार पाऊस; भाततळी घाटात दरड कोसळली
नागपुरात मेघगर्जनेसह पाऊस: अद्याप मान्सूनची प्रतीक्षाच